म्हसळा तालुक्यातील कोळवट ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश


म्हसळा तालुक्यातील कोळवट ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश,खासदार सुनिल तटकरे यांनी केले स्वागत

म्हसळा -प्रतिनिधी

तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था,रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जवळ येवु लागले तशी राजकीय उलथापालथही सुरु झाली असल्याचे निदर्शनास येत आहे.लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे,महाराष्ट्र राज्य मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन म्हसळा तालुक्यातील कोळवट ग्रामस्थांनी शिवसेनेतुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर कोलाड सुतारवाडी येथील गीता बागेत खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत कोळवट येथील स्थानिक व मुंबई निवासी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बबन मनवे,म्हसळा पंचायत समितीचे सदस्य मधुकर गायकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.प्रवेश कर्त्यांमध्ये प्रामुख्याने गाव प्रमुख बाळाराम खेडेकर,जयराम खेडेकर,गोविंद शिंदे,महादेव वाघे,शिवराम खेडेकर,शांताराम शिंदे,सखाराम सावंत,महादेव खेडेकर,सिताराम शिंदे,शिवराम शिंदे,महेश खेडेकर,
सचिन बिरवाडकर,सुनिल येळवे,गणपत येळवे,प्रकाश खेडेकर,पांडुरंग खेडेकर,विजेंद्र लाड,देवानंद भुवड,चंद्रकांत लाड,किसन शिंदे,प्रमोद खेडेकर, प्रकाश शिंदे,शशिकांत खेडेकर, जयेश बिरवाडकर यांचे सह संपुर्ण ग्रामस्थांनी पक्ष प्रवेश केला.म्हसळा तालुक्यात होत असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंगला जोरदार सुरुवात केली आहे.दोन दिवसांपूर्वी घोणसे निवाचीवाडी येथील संपुर्ण ग्रामस्थांनी आमदार अनिकेत तटकरे यांचे उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.कोळवट,घोणसे गावांच्या विकासा बरोबरच पक्ष प्रवेशकर्त्या ग्रामस्थांना पक्षात सन्मानाने सामावून घेण्यात येईल असा शब्द खासदार सुनिल तटकरे,पालकमंत्री आदिती तटकरे,आमदार अनिकेत तटकरे यांनी कोळवट ग्रामस्थांना दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा