संजय खांबेटे : म्हसळा
गौरी -गणपती सणाचे अनुषंगाने म्हसळा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आज झालेल्या शांतता सभेत उपस्थित हिंदू - मुस्लीम समाजाचे प्रतिनिधींच्या वतीने आम्ही म्हसळाकर मुळातच शांतता प्रिय आहोत गौरी -गणपतीचे सणात व भविष्यात आम्ही शांतता राखू अशी दोनही समाजाचे वतीने ग्वाही देण्यात आली. म्हसळा पोलीस स्टेशनचे स.पो.नी. उद्धव सुर्वे व प्रभारी तहसीलदार के.टी. भिंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सभेला, म.रा वि.वि. कंपनीचे माने,म्हसळा तालुका हिंदू समाजाचे अध्यक्ष महादेवराव पाटील, शहर अध्यक्ष सुभाष उर्फ बाळ करडे,कांती भाऊ जैन,मुस्लीम समाजाचे नाजीमचोगले, भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, सुरेश शेठ जैन,बाळकृष्ण म्हात्रे, रवी लाड, बाबाजान पठाण,शाहीद उकये, तालुका भाजपा उपाध्यक्ष अनिल टिंगरे , नगर पंचायतीचे सुरेश जाधव,फोरमन चंद्रकांत वारे व अन्य उपस्थित होते.बहुतांश मान्य वरानी म.रा. वि.वि. कंपनी, सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायत प्रशासन व राज्य परिवहन विभागाचे जबाबदार प्रतिनिधी उपस्थित नसल्याने नाराजी व्यक्त करून पोलिस प्रशासनाने नागरिकांचे प्रतिनिधीत्व करून गौरी-गणपतीचे सणाचे अनुषंगाने नगरपंचायतीचे माध्यमातून आगमन व विर्सजनाचा मार्ग अडचणमुक्त ,स्वच्छ असावा, विर्सजनाचे तीन घाटावर लाईट व्यवस्था व स्वच्छता असावी, लाईफ गार्डची सोय आसावी, म.रा.वि.वि. कंपनीचे माध्यमातून प्रत्येक गाव,वाडीवर स्ट्रीट लाईट लावण्यात यावे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे माध्यमातून बहुतांश मार्गावरील खड्डे तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी पुढे आली. स्थानिक म्हसळा पोलीस व नियुक्त असलेले वाहतुक पोलीस गाडीचे पासींगचे निकषाने शहरातील गणेश भक्ताना प्रवेश देत नाहीत याबाबत सुधारणा होण्याची मागणी केली.
"म्हसळा पोलीस स्टेशन हद्दीत केवळ एक सार्वजनिक गणेश उत्सव असून, जिल्ह्यांत जमावबंदी असल्याने वाद्य - वाजंत्री- मिरवणुकाना बंदी आहे गणेश भक्तानी कायद्याचे पालन व्हावे याची काळजी घ्यावी"
उध्दव सुर्वे, सहा.पोलीस निरीक्षक , म्हसळा.
Post a Comment