श्रीवर्धन प्रतिनिधी : तेजस ठाकूर
श्रीवर्धन नगर परिषदेचे शाळा नंबर २ चे शिक्षक श्री घनश्याम गायकवाड यांना राज्यस्तरीय तंत्रस्नेही पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने देण्यात येणारा २०२१- २०२२ राज्यस्तरीय तंत्रस्नेही पुरस्कार घनश्याम गायकवाड यांना घोषित करण्यात आला आहे. गुरुवर्य घनश्याम गायकवाड यांचा प्रेमळ स्वभाव व शिकवण्याची साधी सोपी पद्धत असल्याने विद्यार्थ्यांच्या सहज लक्षात येते, त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्या मनामध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी स्थान मिळविले आहे. त्याचसोबत शालेय कार्यक्रमांमध्ये गायकवाड गुरुजी हे नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे आम्हास शैक्षणिक, सामाजिक व इतर कार्यक्रम सादर करण्यास स्फूर्ती निर्माण होते. असे श्रीवर्धन नगरपरिषद शाळा क्र. २ चे मुख्याध्यापिका अस्मिता नलावडे यांनी सांगितले. त्याचबरोबर ५ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी सदरच्या पुरस्काराची माहिती मुख्याध्यापिका अस्मिता नलावडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. धनश्याम गायकवाड यांना जाहीर झालेल्या तंत्रस्नेही पुरस्कारा निमित्त विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. सदरच्या शिक्षक दिन कार्यक्रम प्रसंगी श्रीवर्धन नगरपरिषद शाळा नं. २ च्या मुख्याध्यापिका अस्मिता नलावडे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापक समिती शाळा नंबर २ चे राजेश भारती, लक्ष्मीकांत कुलकर्णी उपशिक्षक, वैशाली पाटील उपशिक्षिका, श्रीवर्धन नगरपरिषद केंद्रप्रमुख महेश करंजकर यांनी धनश्याम गायकवाड यांचा सत्कार केला. सदरचा कार्यक्रम प्रसंगी घनश्याम गायकवाड यांच्या पत्नी रेखा गायकवाड व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.
Post a Comment