सामाजिक -राजकिय वारसा असणारे नागलोलीचे सदा विचारे कालवश



संजय खांबेटे : म्हसळा 
श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली येथील सदानंद तात्या विचारे यांचे रविवार दि. ५सष्टे.रोजी वयाचे ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने रहात्या घरी निधन झाले. सामाजिक,राजकिय,शैक्षणिक व विकासा- चे धोरण आसलेल्या सदा विचारे यांचे  निधनाने नागलोली, दांडगुरी,बोर्ली,दिवे आगर या पंचक्रोषीतील जनतेत सदाचे निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.सदा विचारे यानी मुंबई विद्यापिठात विज्ञान शाखेत पदवी घेऊन "गावाकडे चला शेती करू" याचा ध्यास घेतल्याने त्याना ६० च्या दशकात नोकरीची संधी असुनही त्यानी शेती,फळबागायत, शिक्षण व पंचक्रोषीचा विकास ह्याची कास पकडून दांडगुरी येथे हायस्कुलची स्थापना केली,त्यानी शेतीकर  ताना विज्ञानाची सांगड घातल्याने नाविन्य पूर्ण उपक्रम करीत चांगल्या पद्धतीने शेती उत्पन्न घेत, त्यांचा राज्य शासनाचे व जिल्हा परिषदेमार्फत कृषीमित्र, आदर्श व प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मान झाला होता.कृषी क्षेत्रासोबतच श्रीवर्धन तालुका आर्थिक सक्षम होण्यासाठी तालुक्यात पर्यटन विकास होणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते.त्यांचे पश्चात पत्नी,एक भाऊ,४ बहीणी, २ मुलगे, २ मुली ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशाली सावंत यांचे सदा विचारे जेष्ठ बंधू होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा