संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात आजपर्यंत ३६६४ मि. मि.पावसाची नोंद झाली आहे. तर आज सकाळी ६ वाजल्या पासून सायंकाळ पर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडल्याने मॉर्निंग वॉकची मंडळी, शेतकरी, गुराखी, विद्यार्थी, बाजार रहाटी साठी आलेले ग्राहक, उनाड गुरे यांना पावसाने झोडपल्यामुळे काही काळ तारांबळ उडाली होती. म्हस ळ्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळ पासूनच पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे जनजिवन विस्कळीत झाल्याचे तालुक्यात चित्र होते.
कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे.यामुळे कोकणात पोषक हवामान असल्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काहीठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकणात दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो.झाडं, इमारती यांचंही नुकसान होण्याच्या घटना घडतात.
"विजा चमकत असतांना मोठ्या झाडाखाली आश्रय घेणं टाळावं.कारण उंच झाडे स्वत:ला वीजेकडे आकर्षित करतात त्यामुळे दुर्घटना होतात"
तहसीलदार तथा तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख. म्हसळा.
फोटो : पावसामुळे हैराण झालेल्या गुरानी दुकानांच्या पायऱ्यांचा आश्रय घेतला आहे.
Post a Comment