तळा आणि म्हसळा तालुक्यांत रुग्ण संख्या o
त्रिसूत्री नियमांचे पालन आवश्यक
संजय खांबेटे : म्हसळा
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. आज पनवेल मनपा, पनवेल ग्रामिण व उरण तालुका वगळता जिल्हयांतील एकूण रुग्ण संख्या केवळ १०७ आहे.त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. तालुका निहाय आजची रुग्ण संख्या पाहता खालापूर ९, पेण ५, अलिबाग १९ ,रोहा १, श्रीवर्धन१, महाड ५ ,अलिबाग वगळता जिल्ह्यांतील ५ तालुक्यात आकडा हा एक अंकी आहे. तर कर्जत, मुरुड, माणगाव, तळा, सुधागड, म्हसळा, पोलादपूर या ७ तालुक्यात रुग्ण संख्या ० आहे, तळा आणि म्हसळा तालुक्यांत आज उपचार घेणाऱ्यांसह ० रुग्ण आहेत.जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे सुरु आहे.
म्हसळा तालुका आरोग्य आधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड यानी दिलेल्या माहिती नुसार तालुक्यात बाधीत ० व उपचार सुरु असलेले ० रुग्ण आहेत. तालुक्यांत आजपर्यंत कोरोनामुळे बाधीत १०२१, बरे झालेले ९६७, मृत ५४ आहेत.कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, सुरक्षीत अंतर, सततचे हात धुणे (सॅनी टायझरचा वापर ), व मास्क लावणे अशी ती सूत्रीची बंधने नागरिकानी स्वयंस्फूर्तीनी पाळावी असे आवाहन प्रभारी तहसीलदार तथा निवासी नायब तहसीलदार के.टी.भिंगारे यानी केले आहे.
Post a Comment