(म्हसळा प्रतिनिधी)
म्हसळा शहर हिंदू समाजाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश काशिनाथ उर्फ बाबा करडे यांचे मंगळवार दि.२१सप्टेंबर रोजी सायं.७ वा. वयाचे ८१ व्या वर्षी वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले.त्यानी अनेक वर्ष हिंदू समाजाचे अध्यक्ष पद भूषविले, हिंदू समाजाची श्री धावीर यात्रा व विविध उत्सव साजरे करण्यात ते नेहमी अग्रेसर असत त्यांना २०१९ साली आदर्श बागायतदार म्हणून प्रेस क्लब म्हसळाने गौरविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी लिलावती वहीनी ,योगेश व यतीन हे व्यवसायीक मुलगे,दोन मुली, सूना,जावई नातवंडे असा फार मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवार दि.२२ रोजी सकाळी ८. वा. हिंदू वैकुंठ भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
Post a Comment