भिवंडी डेपोच्या गाडीला माणगाव -श्रीवर्धन मार्गावरील ग्रामिण थांब्यांची अँलर्जी ; थांब्यावर गाडी थांबतच नसल्याची तक्रार.



देवघर सह अन्य थांब्यावर गाडी थांबतच नसल्याची तक्रार.

संजय खांबेटे : म्हसळा
काही प्रमाणात शहरी भागात तसेच संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामिण भागात प्रवासासाठी एसटी बस शिवाय पर्याय नाही. "गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी" हे ब्रीद वाक्य प्रवाशांच्या अंगवळणी पडल असतानाच अधिकृत थांब्यावर हात दाखवूनही एसटी बस न थांबल्यामुळे शेवटच्या थांब्या पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांचे काय हाल होत असतील त्याचा अनुभव माणगाव- श्रीवर्धन मार्गावरील देवघर थांब्यावरील जनतेला भिवंडी -श्रीवर्धन- भिवंडी गाडीचे ड्रायव्हर- कंडक्टरने हात दाख वून पॅसेंजरला अवलक्षण दाखवि ल्यावर झाला.या घटनेचे भान राखत तालुक्यातील " एस.टी.प्रवासी दूत" अनिल महामुनकर व सुरेंद्र शिर्के यानी थेट विभागनियंत्रक ठाणे यांचे कडे झाल्या प्रकाराची कैफीयत सादर केली आहे व  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन चे या विषयाचे सन २०१३चे  प्रादेशिक व्यवस्थापकांचे पत्र सादर केले आहे. त्यामुळे श्रीवर्धन परिसरातुन मुंबईकडे व अन्य मार्गावर जाणाऱ्या येणाऱ्या बसेसना (कोणत्याही  आगारा च्या ) श्रीवर्धन ते माणगाव व श्रीवर्धन ते गोरेगाव या मार्गावरील सर्व थांब्यांवर प्रवासी चढ-उतार करणे वाहक -चाल काना बंधनकारक आहे.

"श्रीवर्धन आगारा व्यतिरिक्त ठाणे, स्वारगेट व भिवंडी आगाराच्या ठाणे -बागमांडला - ठाणे,  ठाणे - दिवेआगर - ठाणे, स्वारगेट-दिवेआगर - स्वारगेट ( व्हाया गोरेगांव), भिवंडी- श्रीवर्धन -भिवंडी या चार मार्गावर बस फेऱ्या सुरु आहेत."

"महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. त्याच उद्देशाने चांढोरे, घोणसे,देवधर,पंचक्रोशीतील प्रवासी सामाजिक दृष्टीनेच महामंडळा कडे पाहत आलेले आहेत"
सुरेंद्र शिर्के, प्रवासी संघटना 

फोटो : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहनचे प्रवासी थांब्याविषयीचे सन २०१३चे  प्रादेशिक व्यवस्थापकांचे पत्र .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा