संजय खांबेटे : म्हसळा
गणेशभक्त दरवर्षी गणेशोत्सव सणाची आतुरतेने वाट पहात असतात.त्याच प्रमाणे आज तालुक्यातील ८० गावातून ३१०५ श्रीं ची प्राण प्रतिष्ठा झालीआहे.अनेक शहरांतून व गावातून गणेश चतुर्थीच्या पूजनाच्या मूर्तीचेआदल्या दिवशी "श्री" चे आगमन होत आसल्याने आज शुक्रवार दि.10 सप्टेंबर रोजी गणरायाच्या स्थापनेच्या सकाळच्या प्रहरापासून चा शुभ मुहूर्त भाविक साधत आहे. त्यासाठी आज सकाळ पासून भाविकांची लगबग सुरू होती.ब्राह्मण पुजारीच्या उपलब्धतेनुसार भाविकानी मुहूर्त साधला. आज पासून सुरु होणारा गणेश उत्सव कोकणात १० दिवस उत्साहात साजरा केला जातो. भाविक आपल्या श्रद्धे प्रमाणे दीड, पाच, सात आणि दहा दिवस गणरायाची सेवा करतो. या दिवसांमध्ये रोज बाप्पाची पूजा केली जाते.सकाळ-संध्याकाळ आरती होते. रोज गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. एखाद्या दिवशी भजन होते. शेवटच्या दिवशी जागरण करुन खेळ खेळले जातात. अशाप्रकारे गणपती आगमनानंतर दिवस आनंदात आणि भक्तीमय वातावरणात निघून जातात. बाप्पाला ठरलेल्या वेळी निरोप दिला जातो आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच्या आगमना ची प्रतिक्षा केली जाते. तालुक्यात या वर्षी दीड दिवसाचे गणपती ९०५ त्यांचे शनी दि.११रोजी ,गौरीविर्सजना सोबत जाणारे १४६० त्यांचे मंगळवार दि. १४ सप्टें.रोजी विसर्जन होणार आहे.अनंत चतुर्थी दिवशी विसर्जन होणारे ७४० श्रीं चे रवीवार दि. १९ रोजी विर्सजन होणार आहे.
Post a Comment