म्हसळा ग्रामिण रुग्णालयाच्या ढिसाळ कारभाराने सर्व सामान्य जनता होते त्रस्त ; फुकटच्या सेवा घ्याव्या लागतात विकत



संजय खांबेटे : म्हसळा 

म्हसळा येथे ग्रामिण रुग्णालय सुरु होऊन शासनाकडून मिळणाऱ्या आरोग्य सेवा या अर्धवट मिळत आहेत त्याला राज्य शासना ची आरोग्य यंत्रणा जबाबदार आसल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. सर्वसाधाराणपणे ग्रामिण रुग्णालय वैद्यकिय अधिक्षकांच्या जबाबदारी खाली सुरु असते त्या महत्वाच्या पदावर प्रभारी अधिक्षक म्हणून श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक आहेत त्यामुळे त्यांचे म्हसळा ग्रामिण रूग्णालयाकडे दुर्लक्ष होते,अन्य आवश्यक ३ वैद्यकीय आधिकारी म्हणून मंजूर असताना एकडॉक्टर श्रीवर्धन येथे कायम स्वरुपी नेमणूक तर अतिरीक्त कारभार म्हसळ्याचा तर दुसरा वैद्यकीय आधिकारी नांदवी प्रा.आ. केंद्रात कायम स्वरुपी नेमणूक तर अतिरीक्त कारभार म्हसळ्याचा अशी स्थिती आहे. तर रुग्णालयातील अन्य रिक्त पदे पुढील प्रमाणे आहेत. क्ष किरण तंत्र, प्रयोगशाळा सहाय्यक१,अधीपरिचारीका ३, कक्ष सेवक ३ आणि सफाई कामगार १ अशी पदे आजच्या स्थितीत रिक्त आहे. संपूर्ण रुग्णालयाची सफाई करण्यासाठी एकच कामगार,सर्व कक्षांची सफाई करण्यासाठी एकच कक्ष सेवक आसल्याने सद्यस्थितीत रुग्णालयात अस्वच्छता होत आहे व कार्यरत कामगारांवर ताण येत आहे. रुग्णालयांत दोन X-Ray मशीनआहेत तर क्षकीरण तंत्रज्ञ चे पद रिक्त आसल्याने प्रभारी क्षकीरण तंत्रज्ञ प्रत्येक X-Rayचे किमान रु५० चार्ज अकारत आसल्याचे पुढे येत आहे. मागणी केल्यावर  रुग्णाला X-Rayची प्रिंट दिली जात नाही , घेतलेल्या फीची पावती दिली जात नाही.अनेकवेळा रोगाला आवश्यक औषधे उपलब्ध नसल्या मुळे पर्यायी औषधांवर भागविण्यात येते.

"रुग्णालयांत प्रभारी असलेले दोन वैद्यकीय अधीकारी रजेवर असल्याने सध्या कार्यरत असणारे डॉ. महमद रहाटवीलकर,डॉ.अली खान यांची वैद्यकिय सेवा दर्जेदार आसल्या ने म्हसळा ग्रामिण रुग्णालयात त्याना पुढील कालावधीची म्हसळासाठी नेमणूक द्यावी अशी मागणी जिल्हा शल्यचिकीत्सक अलिबाग यांचेकडे माजी सभापती महादेव पाटील करणार आहेत.

" म्हसळा ग्रामिण रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हसळ्यात उपस्थित नसतात तर बहुतांश वैद्यकीय अधिकारी प्रभारी म्हणून कार्यरत आसल्याने ग्रामिण रुग्णालया बाबतच्या कोणत्याही तक्रारीची दखल घेत नाही"

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा