म्हसळा -प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील सर्व सामान्य माणसाला दर्जेदार आणि मोफत रुग्णसेवा मिळण्यासाठी
खासदार सुनिल तटकरे यांनी शासन दरबारी विशेष प्रयत्न करून म्हसळा शहरात भव्य असे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारले आहे.गेल्या दोन वर्षात हे रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी आणि त्याचा दर्जा उंचावण्यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे यांनी महाराष्ट्र शासन दरबारी अथक मेहनत घेऊन रुग्णालयात स्वतंत्र कोविड सेंटर,रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड,पक्षाचे व शासनाच्या वतीने ऑक्सिजन कॉंसेंट्रेटर्,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती,नवीन एक्सरे मशीन,नवी रुग्णवाहिका,कोरोना प्रादुर्भाव लसीकरण सेंटर,औषध पुरवठा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असे असताना येथे स्थानिक पातळीवर सातत्याने वेगवेगळ्या बाबतीत आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय अधिकारी यांचे बाबत तक्रारींचा सुर ऐकायला मिळत असल्याने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.दिनांक 25 जानेवारी 2021रोजी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून दिलेल्या बायो मेडिकल वेस्ट प्लांटचे उदघाटन तसेच 12 ड्युरा ऑक्सिजन सिलेंडरचे हस्तांतरण पालकमंत्री रायगड जिल्हा तथा राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते करण्यात आले.या वेळी त्यांचे समावेत कार्यक्रमाला जेष्ठ नेते अलीशेट कौचाली,तालुका अध्यक्ष समीर बनकर,सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,पस सदस्य मधुकर गायकर,उपविभागीय अधिकारी समीर शेडगे,तहसीलदार समीर घारे,पिआय उद्धव सुर्वे,गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे,प्रकल्प अधिकारी व्यंकट तरवडे,बांधकाम अभियंता गणगने,पाणी पुरवठा अभियंता युवराज गांगुर्डे,डॉ.कराड,माजी सभापती नाजीमभाई हसवारे,नगराध्यक्षा जयश्री कापरे,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,शहर महिला अध्यक्षा शगुप्ता जहांगीर,शांताराम गायकर,गट नेते संजय कर्णिक,शाहिद उकये,
सतीश शिगवण,महेश घोले,किरण पालांडे,शेखर खोत,सलीम बागकर,प्रकाश गाणेकर आदी मान्यवर पदाधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी कोरोना कालावधीत आरोग्य सेवा केलेल्या आणि सेवेतुन कमी केलेल्या स्थानिक कंत्राटी कामगारांच्या आणि नवीन सेवा कर्मचारी भरती बाबत समस्या जाणून घेतल्या.म्हसळा तालुक्या प्रमाणेच तळा तालुक्यात लवकरच ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.शासन दरबारी तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय उभारणी करण्यात येणार असल्याची कार्यवाही करण्यात आली आसुन तळा तालुक्यात तातडीने कार्यवाही करण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी एमइपीएल चे डायरेक्टर सुधा म्हात्रे यांना सुचित केले.म्हसळा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना भेडसावत असलेल्या समस्या का निर्माण होतात आणि त्या करतो कोण या बाबतीत होत असलेल्या राजकारणाची चौकशी करून त्याचे वेळीच निराकरण करावे अशी मागणी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी केली आहे.
Post a Comment