अभ्युदयनगरात श्रीकृष्ण जन्मोत्सव हर्षोल्हासात साजरा




मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभ्युदय कला दालन आणि न्यु बजरंग व्यायाम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑगस्ट २०२१ रोजी न्यु बजरंग व्यायाम शाळेच्या प्रांगणात "श्रीकृष्ण जन्मोत्सव" साजरा करण्यात आला. 

श्रीकृष्ण जन्मोत्सवाचा सोहळ्याला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) चे अध्यक्ष तसेच प्रभाग क्रमांक २०५ चे विद्यमान नगरसेवक दत्ताराम पोंगडे, शिवसेना शाखा क्रमांक २०५ चे शाखाप्रमुख जयसिंग (आप्पा) भोसले, भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक २०५ चे वॉर्ड अध्यक्ष गणेश शिंदे, युवा उद्योजक उदय पवार, अभ्युदय कला दालनाचे सन्माननीय मार्गदर्शक तसेच समाजसेवक डॉ. प्रागजी वाझा, अभ्युदय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे विश्वस्त चंद्रकांत परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुरूवात झाली.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला न्यु बजरंग व्यायाम शाळेचे विद्यमान अध्यक्ष जनार्दन धाडवे (मास्तर) यांनी शाळेच्या आठवणींना उजाळा देताना अवध्या  मिनिटांत ८४ वर्षांचा प्रवास उलगडला. शासनाने दिलेल्या निर्णयानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यात आला. अभ्युदय कला दालनच्या संयुक्त विद्यमाने आजचा सोहळा फेसबुक लाईव्हमुळे सर्वदूर पोहचवता आला.

अभ्युदय कला दालनचे सन्माननीय मार्गदर्शक तसेच समाजसेवक डॉ. प्रागजी वाझा, चंद्रकांत परब, गिरीश कारेकर, विनोद साळवी, परशूराम राणे तसेच न्यु बजरंग व्यायाम शाळेचे विद्यमान अध्यक्ष जनार्दन धाडवे (मास्तर), दत्ताराम चिबडे (सचिव), रमेश म्हसकर (खजिनदार) सर्व विश्वस्त नारायण विचारे, चंद्रकांत भोसले, रामचंद्र पौलेकर, रुपेश भुवड, राजेश दळवी, देवदास दोरकर, दत्तात्रय चाळके, महेश धाडवे, गणेश भुवड, योगेश धाडवे, दिनेश भुवड, रंगराव शेळके, कमलेश भुवड, मनोहर बर्वे, शैलेश सकपाळ, तुषार डोळस, कृष्णा गुरव, मंगेश सावंत, विनोद साळवी, स्वप्निल पांचाळ, सुनिल आगरे, जनार्दन राणे ह्यांच्या अथक परिश्रमामुळे श्रीकृष्ण जन्मोत्सव हर्षोल्हासात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा