संजय खांबेटे : म्हसळा
ठाण्यात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यां वर कारवाई सुरू असताना पालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर घोडबंदर येथील एका फेरीवा- ल्याने चाकूने हल्ला केला याचा राज्यभर निषेध होत असताना म्हसळा नगरपंचायत कार्यालया तील कर्मचारी अधिकाऱ्यानी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून सदर घटनेचा निषेध नोंदविला यामध्ये श्रीम. दिपाली मुंडये, (कार्यालय अधिक्षक),ज्योती करडे,प्रियांका चव्हाण,संतोष कुडेकर,सुरेश जाधव,सुरेंद्र चाळके,फरहान साने,अशोक सुतार,सचिन मोरे,अस्मिता हाटे,संजना मोहिते,वनिता पवार, प्रणित बोरकर आदी कर्मचारी होते.मुख्य अधिकारी संघटनेने या कृत्याचा जाहीर निषेध केला,वेळोवेळी आशा पध्दतीची कामे नगर परिषदा,नगर पालिका,नगरपंचायती पातळीवर करीत असताना कर्मचारी अधिकाऱ्याना भविष्यात त्रास न होणे व आरोपीला गंभीर शासन होण्यासाठी आम्ही नगरपंचायत पातळी वर दिवसभर काळ्या फिती लावून काम करीत निषेध केला असे म्हसळा नगरपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने दिपाली मुंडे यानी सांगितले.
कल्पिता पिंपळे यांच्या हातावरील बोटावर चाकूने हल्ला झाल्याने त्यांची तीन बोटे छाटली असून डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्या चा प्रकार घडला. या हल्ल्यामुळे फेरी वाल्यांचा मुजोरीपणा पुन्हा एकदा चव्हाट्या वर आल्याचे पाहायला मिळाले.
Post a Comment