श्रीवर्धन तालुक्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी



 बोर्लीपंचतन । मकरंद जाधव 
शिवकालीन परंपरा लाभलेला नारळी पौर्णिमेचा सण रविवार दि.२२ आॕगस्ट रोजी श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल,दिघी दिवेआगर,आदगाव समु़द्र किनाऱ्यावर उत्साहात साजरा झाला.
सागराच्या उसळणाऱ्या महाकाय लाटांचं आव्हान झेलत अथांग सागराशी नातं सांगणारे कोळी बांधव आपल्या परंपरागत मासेमारी व्यवसायासाठी आपला जीव धोक्यात घालुन समुद्रात मासेमारीसाठी जात असतात त्यामुळे सागरावर अवलंबून असलेल्या कोळी बांधवंसाठी हा दिवस फार महत्वाचा असतो.जुन जुलै हे दोन महिने समुद्र खवळलेला असल्याने मासेमारी बंद असते.विश्रांती घेतलेल्या नौकांना रंगरंगोटी करुन कोळी बांधव आपल्या कुटुंबाला मागे ठेवून भर समुद्रात आपल्या व्यवसायासाठी या दिवशी पुन्हा सज्ज होतात.त्यावेळी कोळी महिलांची मदार त्यांच्या दर्याराजावरच असते.त्यामुळे कोळी महिलांच्या दृष्टीनेही या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
नारळी पौर्णिमेन‌िमित्त श्रीवर्धन समु़द्र किनारी जीवना कोळी समाज अध्यक्ष काशीनाथ चुनेकर यांच्या हस्ते प्रथम पुजन करण्यात आले तदनंतर सर्व कोळी बांधवांनी मनोभावे पुजा करुन सागराला विधीवत श्रीफळ अर्पण केले.कोळी भगीनींनी समुद्राची यथासांग पूजा करुन खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर,आमच्या बोटीवर भरपुर म्हावरा मिळू दे…असे गाऱ्हाणे समुद्राला घातले 
व्यापारी बांधवही या वेळी सागराला श्रीफळ अर्पण करुन नतमस्तक झाले.
याप्रसंगी चुनेकर पार्टीचे अध्यक्ष जनार्दन चुनेकर उपाध्यक्ष प्रभाकर पटेकर त्याचबरोबर जनार्दन पाटील, काशिनाथ जंजिरकर,चंद्रकांत भगत,भारत चोगले व कोळी महीला,बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा