रायगड मधील विविध कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी
टीम म्हसळा लाईव्ह
समुद्राकाठी रहाणार्या व प्रामुख्याने मासेमारी करणार्या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. सोन्याचा नारल वाहिन मी तुला !! हे देवा तारु येऊ दे बंदराला!! कोळी बांधवांनी अथांग सागरला अशी साद देत आज रायगड मधील, दिघी, श्रीवर्धन, भरोडखोल, हरिहारेश्वर, म्हसळा, अलिबाग येथील विविध कोळीवाड्यात आज नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. आज नारळी पोर्णिमेनिमित्त सायंकाळी कोळीवाड्यांमध्ये कोविडचे भान राखत मिरवणूका निघाल्या. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत रायगड मधील विविध कोळीवाडयातील विविध अध्यक्षांनी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण केला. तर समुद्रात भरपूर म्हावंरा लागू दे. आमच्या बोटी सुखरूप किनारी येऊ दे, अशी मनोभावे सागराचे पूजन करून कोळी महिलांनी प्रार्थना केली अशी माहिती भरडखोल कोळीवाड्यातील श्री हरिओम चोगले यांनी दिली.
भरडखोल गावचे प्रेरनास्थान श्री रामचंद्र बाळ्या वाघे भरडखोल कोळी समाज अध्यक्ष श्री चंद्रकांत खोपटकर उपाध्यक्ष श्री चंद्रकांत वाघे खजिनदार श्री अलंकार पाटील सरपंच श्री हरिओम चोगले कोळीसमाज पंचकमेटी , कायकर्ते , अखंड कोळी समाज भरडखोल महीला पुरुष ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये श्री अनंत भोईनकर यांच्या हस्ते सोन्याचा नारळ समुद्रामध्ये अर्पण करण्यात आला.
Post a Comment