रोहा (वार्ताहर)
एक राखी देशासाठी उपक्रमाच्या माध्यमातून रायगडसह विविध जिल्ह्यांमधून सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या सदस्यांनी आपल्याला विभागात उपक्रमाची जनजागृती करत सीमेवर अहोरात्र लढणाऱ्या सैनिक बांधवांसाठी 6225 राख्या व संदेश पाठविले.
सलग पाचव्या वर्षी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यशस्वीपणे हा उपक्रम राबवण्यात आला.
सुराज्यचे अनिकेत पाशीलकर व संचित हरिहर यांनी कार्यक्रम प्रमुख म्हणुन या उपक्रमाची यशस्वीपणे आपली भुमिका पार पाडली.
रोह्यामधील कोलाड,वरसे,धाटाव, शेणवई, नागोठणे, मालसई,प्रभाग क्र ८ तसेच खारापटी मधील नागरिक तसेच रोहातील राजमुद्रा फौंडेशन, जनशिक्षण संस्था,सखी मंच, कोलाड-रोहा विविध बचत गट,नगरपालिका महिला व्यायामशाळा, तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट,रोट्रॅक्ट,रोटरी क्लब,ब्राह्मकुमारीज रोहा, माहेरवाशीण गृप
हनुमान नगर,सिद्धिविनायक सोसायटी,धावीर प्लाझा,ग्रीन पार्क बिल्डिंग आदींनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
यासह माणगाव,मुंबई, कोल्हापूर, ठाणे,रत्नागिरी येथील नागरिकांनी सुराज्य सदस्यांकडे राखी देऊन सहभाग दर्शविला.
रोहा नगरपालिका नगरसेवक सौ.स्नेहा आंबरे,जनशिक्षण संस्थेचे कोकणे सर,राजमुद्रा फौंडेशनच्या सौ.श्रध्दा घाग, सौ.जयश्री भांड,शेणवईच्या सरपंच कु.प्रगती देशमुख यांनी या उपक्रमासाठी चांगले सहकार्य केल्याची माहिती सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर यांनी दिली.
या उपक्रमासाठी सुराज्यच्या जुईली लाड,आदेश भोकटे,मयुर धनावडे,प्रिया जंगम,प्रसाद पाटूकले,वेदांत देशमुख,सुमित कडु,सुमित खरात,मोनिष भगत,अथर्व लोहट,तुषार दिघे,सुमित वडे या सदस्यांनी अतिशय चांगले परीश्रम घेत लोकांमध्ये जनजागृती केली.
Post a Comment