संजय खांबेटे : म्हसळा
एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुसार एस.टी.ची सेवा खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. परंतु मागील दोन वर्षापासून श्रीवर्धन आगाराची सेवा ठिसाळ झाल्याची प्रवाशां ची तक्रार आहे. म्हसळा वासीयांची रिर्झ- वेशनची ( Reservation) सुविधा म्हसळा एस.टी. स्टँड मधून तात्काळ सुरु व्हावी अशी मागणी नागरिक- प्रवाशी सातत्याने लाऊन धरुन सुध्दा आगारप्रमुख दुर्लक्ष करीत आहेत.म्हसळा स्टँड मधून सध्या २५ बस विविध मार्गावर धावत आहेत त्यामध्ये नालासोपारा ४, बोरीवली ४, मुंबई १२,लातूर,पुणे,नाशिक, भिवंडी,चिपळूण मार्गे मिरज प्रत्येकी १ फेरी होते. यामार्गावर म्हसळा स्टँडमधून मोठया संखेने प्रवाशांची ये -जा असते आशावेळी परिवहन विभागाकडून म्हसळा एस.टी. स्टँड मधून रिर्झवेशनची सुविधा तात्काळ सुरु व्हावी ही मागणी सातत्याने पुढे येत आहे.जुन पासून तालुका पातळी वर बहुतांश गावातून तालुका मुख्यालया पर्यंत श्रीवर्धन आगारातून प्रवाशी वाहतुक पूर्ववत सुरू केल्याने प्रवाशी संघटना एस.टी.महामंडळाचेआभार मानत आहे. प्रवाशांचे हिताचे व महामंडळाचे फायद्या च्या मार्गावर सेवा पूर्ववत कराव्या आसा सल्ला प्रवासी संघटना देत आहेत.सकाळी ६.३०वा सुटणारी श्रीवर्धन साई मार्गे भांईंदर ही बंद असणारी बस पूर्ववत सुरु करावी,तीची भाईंदर वरुन सुटण्याची वेळ रात्री ८ किंवा ९वा.असावी अशी मागणी वसई,विरारा,नायगाव,माणिकपूर परिसरां तील प्रवाशानी केली आहे.
"म्हसळा शहरांत मध्यवर्ती ठिकाणी सन २०११ मध्ये तत्कालीन पालकमंत्री ना. सुनिलजी तटकरे यानी म्हसळ्यातील प्रवाशांसाठी पाहिल्या मजल्यावर वाहतुक नियंत्रक व दुसऱ्या मजल्यावर रिर्झवेशन व विद्यार्थी पास या साठी दुमजली इमारतीचे लोकार्पण केले म्हसळा शहरांत रिर्झवेशन व विद्यार्थी व सवलत पास याला मागणी असूनही सेवा सुरू करत नाही हे प्रवाशां साठी दुर्देव आहे"-अनिल महामुनकर, सामाजिक कार्यकर्ते , म्हसळा.
Post a Comment