डेडिकेटेड कोविड हेल्थसेंटर" (डीसीएचसी) मधून ६५ रुग्ण झाले
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यांत कोव्हीड १९ ची रुग्णसंख्या मियंत्रणात आली आहे.आज तालुक्यात कोराना बाधीत एकही रुग्ण सापडला नाही तर ग्रामिण भागातील २ रुग्णांसह तब्बल ९२० रुग्णानी सकारा- त्मकरित्या कोरोनावर यशस्वी मात केल्याचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शरद गोसावी यानी सांगितले.
तालुक्यातील जिल्हा परिषदआरोग्य यंत्रणेला व म्हसळा येथील ग्रामिण रुग्णाल-याला कायम स्वरुपी वैद्यकिय अधिक्षक, पुरेसे कर्मचारी व तांत्रिक सुविधा द्याव्या त्याच बरोबरीने कोवीड केअर सेंटर सुरू करावे यासाठी म्हसळा प्रेस क्लबने खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे पाठपुरावा केला,त्याप्रमाणे१८ ऑक्टोबर २० पासून म्हसळा (वरवठणे)आय.टी.आय मध्ये ४० खाटांचे कोवीड केअर सेंटर सुरु केले पण कोवीड केअर सेंटरमध्ये तालुक्या तील एकही कोवीड पॉझीटीव्ह किंवा लक्षणे आसलेला रग्ण दाखल करावा लागला नाही. नंतर राज्यात व जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील रुग्ण वाढत असताना पालकमंत्री अदीती ताई तटकरे यांच्या प्रयत्नाने म्हसळा ग्रामिण रुग्णालयात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसह ४० खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) ३१ मे २१पासून सुरू करण्यात आले. त्यामध्ये कोरोना रुग्णांना स्वतंत्र बेड,मोफत औषधोपचार,शरीराचे तापमान,ऑक्सिजन ची पातळी व रक्ताच्या तपासण्या, छातीचे एक्स-रे,गरजूंना ऑक्सिजन सुविधा,चोवीस तास आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची व्यवस्था व रुग्णाना मोफत भोजन होते.
तालुक्यातील कोव्हीड १९ रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने ३० जुलै पासून ४ ऑगस्ट पर्यंत कोव्हीड हेल्थसेंटर मध्ये एकही रुग्णभरती नसल्याचे समजते. डेडिकेटेड कोव्हीड हेल्थसेंटर (डीसीएचसी) चा फायदा शहर व तालुक्यातील ६५ पॉझीटीव्ह रुग्णाना झाला.
डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये लढणारे योध्दे.
डॉ.महेश मेहता, डॉ.अलंकार व डॉ.सोनाली करंबे, डॉ. किरण कराड, डॉ. मयुर हेगडे, डॉ. मुनिम लोखंडे,दिशा बांदेकर-मोहीते, ममता मोरे, आधिपरिचारिका श्रीमती पुष्पा वारीशे, रविशा पावरी, शितल लेंडे, संगिता प्रजापती, प्रेरणा पवार, सायली केळस्कर, दिपिका गायकवाड, दिव्या पाटील, प्रियंका पाटील.
कोव्हीड कक्ष सेवक अंकुश नटे, शिवतेज म्हशीलकर, धनश्री -सुचिता अंगम, सुदेश शिगवण, हरीश डांगे या सर्वानी कोव्हीड हेल्थसेंटर मधील रुग्णांसाठी चांगली सेवा दिली. म्हसळा तालुक्यात नैसर्गिक वातावरण चांगले आसल्याने कोवीड रुग्ण संख्या साधारण असतानाच तालुक्यातील गरीब कोवीड रुग्णांची सोय स्थानिक पातळीवर व्हावी हा प्रश्न प्रेस क्लबने लावून धरला होता.
Post a Comment