अर्चना येलवे बी.ए. परीक्षेत म्हसळयात सर्वप्रथम : तालुक्यात होत आहे कौतुक.



(म्हसळा प्रतिनिधी)
रवींद्र उर्फ वसंत येलवे ताम्हणे करंबे ता. म्हसळे यांची सुकन्या कुमारी अर्चना रवींद्र येलवे हिने म्हसळा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात कला शाखेतील अर्थशास्त्र व इतिहास या विषयात प्रथम येण्याचा मान पटकाविला , अर्चना हीचा विद्यालयाचे विविध प्रकारच्या स्पर्धेत प्राधान्याने सह भाग आसायचा तीच्या यशाचे कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.मुश्ताकभाई अंतुले , स्थानिक ट्रस्टी सेक्रेटरी फजल हळदे, प्रभारी प्राचार्य एम. एस जाधव, विषय शिक्षक डाॅ. एस यू बेंद्रे, प्रा. शिरीष समेळ, ग्रंथपाल प्रा.आर.एस. माशाळे यांनी अभिनंदन केले.
      गरिबी,खडतर आणी प्रतिकुल परिस्थितीत ताम्हणे करंबे सारख्या दुर्गम भागातून पायी म्हसळा येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात अर्चना येत आसे तीच्या यशाचे ग्रामिण भागातून विशेष अभिनंदन होत आहे.भविष्यात M.P.Sc सारख्या स्पर्धा परिक्षेचा आभ्यास करून शासकिय सेवा करण्याचा मानस अर्चनाने व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा