तळा तालुक्यात गुरांना त्वचा रोगाची लागण.शासनाने लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे.



तळा -किशोर पितळे- तळा तालुक्यात गुरांना त्वचा रोगाची लागण झाली असल्याने गुरे मालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.तळा तालुक्यात उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने शेती हा येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय आहे.सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतात नांगरणीसाठी गुरांची आवश्यकता असते.परंतु तालुक्यात शेकडो गुरांना त्वचारोगाची लागण होत असल्याने या गुरांच्या लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे असल्याचे मत शेतकरी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

तालूक्यात सालशेत, तळेगाव, कासेवाडी,मेढे अशा गावातुन त्या गुरपालक व ग्रामस्थांनी केलेल्या मागणी नुसार या भागात जवळपास ६०० हुन अधिक गुरांचे लसीकरण करण्यातआले आहे.रोगांची लागणलक्षात घेता या लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.या रोगाची लक्षणे म्हणजे अंगावर फोडी येणे,  खाज येणे, पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्यामुळे या जखमा वाढण्याची शक्यता आहे. यासाठी वेळेवर लसीकरण मोहीम हाती घेणे गरजेचे आहे.असे शेतकरी बांधवांकडुन सागंण्यात येत आहे. एकतर जनावरांची संख्या दिवसें दिवस कमी होत असून त्यामध्ये गुरांच्या किमतीही दिवसें दिवस वाढत चालल्या आहेत.अशातच जनावरांना होत असलेल्या त्वचा रोगामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.


गुरांना त्वचारोग या आजारांमध्ये गुरांचे पुढचे दोन्ही पाय सुजतात.अंगात ताप येतो आणि अंगावर फोडी येतात.चार दिवस गुरे खात नाहीत.औषध उपचाराने गुरे बरी होतात.घाबरण्याचे काही कारण नाही.पण लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. -आर.बी. पोवार, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती तळा


 गुरांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.कारण ही जनावरे शेतकरी बांधवांचे मौल्यवान धन आहेयाबाबत शासनाने गावागावात जनावरांना लसीकरण पुरविणे गरजेचे आहे.ते लवकरच कसे होईल याकडे लक्ष द्यावे.-

ज्ञानेश्वर भोईर. बळीराजा शेतकरी संघ तळा   

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा