पूरग्रस्तांच्या सेवेसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे अहोरात्र योगदान




 श्रीवर्धन प्रतिनिधी तेजस ठाकूर


       २२ जुलै रोजी महाडमध्ये झालेल्या पुराच्या संकटाने अनेक गावे, घर, संसार, खाजगी व सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठ्या स्वरूपात नुकसान झाले. त्याचसोबत मनुष्याच्या दैनंदिन जीवनातील घरउपयोगी सेवा म्हणजे वीज. याच विजेचे खांब २२ जुलै रोजी काही क्षणात जमीनदोस्त झाले. काही ठिकाणी वायर तुटण्यात आली व ट्रान्सफॉर्मर मध्ये पाणी शिरल्याने ते बदलवण्याचे कार्य अतिशय वेगात सुरु आहे. सदरची अखंडित सेवा सुरू करण्यासाठी महाड, श्रीवर्धन व आजूबाजूच्या भागातून  महावितरणाचे कर्मचारी दिवस-रात्र युद्धपातळीवर काम करत आहेत. पडद्याच्या समोरील कलाकारासाठी जसे पडद्यामागचे कलाकार असतात त्याचप्रमाणे पडद्यामागचे कलाकार म्हणून महावितरणाचे कर्मचारी भूमिका बजावत आहेत. व त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.




Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा