संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेचा राज्य शासनाचे वतीने रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री ना.आदीती तटकरे यानी आज कोव्हीड योध्दे म्हणून सन्मान केला व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी कुमारी तटकरे यानी राज्यातील आरोग्य विभाग सक्षम तरच आपण सर्व पातळीवरील म्हणजे प्रशासनातील विविध विभाग आणि लोकप्रतिनिधी , प्रेस यंत्रणा भविष्यात कार्यक्षम राहील असे अभिमाना ने सांगत आरोग्य कर्मचाऱ्यानी कोव्हीड कालावधीत वेळ पडल्यास आपल्या कौटुंबी क समस्यां कडे दुर्लक्ष करीत केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.आरोग्य विभागा तील कर्मचा ऱ्यांचे सक्षम सहभागा मुळे मागील २ वर्षात कोव्हीड १९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवर राज्य शासनाने यशस्वी मात केली आता येणाऱ्या तिसऱ्या लाटे वरही यशस्वी मात करण्या साठी सर्व स्तरावरील मंडळी आभ्यास करीत आहेत यातही आरोग्य कर्मचांऱ्याचा सहभाग मोलाचा ठरणार आहे असे आभिमानाने सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सभापती बबन मनवे,सभापती छाया म्हात्रे, उप सभापती संदीप चाचले,प.स.सदस्य मधुकर गायकर,माजी सभापती उज्वला सावंत, नगराध्यक्ष जयश्री कापरे, हलदे,महिला अध्यक्षा रेश्मा काणसे,गण अध्यक्ष सतीश शिगवण,अनिल बसवत,किरण पालांडे, संजय कर्णिक,चंद्रकांत कापरे,संतोष नाना सावंत, तहसीलदार शरद गोसावी,अेपीआय उध्दव सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत गायकवाड,प्रा.आ. केंद्र म्हसळा च्या डॉ. प्रियांका देशमुख , डॉ.नेहा पाटील, प्रा.आ.केंद्र खामगाव डॉ.गीतांजली हंबीर, डॉ.प्राजक्ता पोटे प्रा. आ.केंद्र मेंदडी डॉ. विशाल भावसार, डॉ.पूजा डोंगरे, Cho डॉ.चारुशीला गायकवाड व आरोग्य सेवक मंगेश चव्हाण, अरुण कोल्हे, सागर सायगावकर आरोग्य सेविका शितल भगत, दिपिका दिवेकर, ज्योती महाडीक,आरोग्य सहायक शैलेश लाखे, DEO गणेश दाताळ आदी कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यातआला. यावेळी आयोजकानी पोलीस यंत्रणेचे अेपीआय उध्दव सुर्वे व प्रेस क्लबचे बाबू शिर्के यांचा सत्कार केला. सूत्र संचालन प्रा.आ. केंद्र म्हसळा येथील वैद्यकिय आधिकारी डॉ.नेहा पाटील यानी केले
Post a Comment