◾काडसिद्धेश्वर महाराज यांनी अधिकारी आणि वास्तुविशारद यांना सोबत घेऊन केली पाहणी
चिपळूण दि.२२ ऑगस्ट (ओंकार रेळेकर) आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या आणि घरांचे संपूर्ण नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंबाच्या मदतीला पुन्हा एकदा प.पु.अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज धावून आले आहेत.श्री क्षेत्र कणेरी मठ.कोल्हापूर संस्थान आणि लुपिन फौंडेशन सिंधुदुर्ग ने याबाबत महत्वकांशी निर्णय घेतला असून पूरग्रस्त कुटुंबांना पक्की घरे बांधून मिळणार आहेत. रविवारी मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांनी शहरात पायी फिरून अशा घरांची पाहणी केली.
सिद्धगिरी कणेरी चे मठाधिपती स्वामीजी काडसिद्धेश्वर महाराज यांच्या विशेष सहकार्यातून चिपळूण मधील महापुरात घरांचे संपूर्ण नुकसान झालेल्या आणि आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या कुटुंबांना त्याच जागेत चांगल्या दर्जाची घरे बांधून मिळणार आहेत.या करिता संबंधित घरे ज्या जागेत आहेत ती जागा त्या व्यक्तीच्या नावावर असणे गरजेचे आहे आणि जी कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशांचाच प्राधान्याने विचार केला जाणार आहे.चिपळूण तालुक्यात २२ जुलै रोजी आलेल्या महापुरात नागरिकांची मोठ्याप्रमाणात नुकसानी झाली संपूर्ण व्यापार उद्योग ठप्प झाला होता व्यापारी वर्गही नुकसानीमुळे होरपळून गेला होता. या महापुरात शहरात आणि तालुक्यात विविध ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली पूरग्रस्त नागरिकांच्या मदत कार्यासाठी कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर महाराज सुरुवातीपासूनच स्वतः थेट मदत कार्यात उतरले होते यामध्ये अन्नधान्य ,जीवनावश्यक वस्तू कपडे ,इत्यादीचे स्वामी महाराजांनी स्वतः नुकसानग्रस्त भागात पायी फिरून वाटप केले होते. एवढेच नाही तर स्वामी महाराज हे स्वतः साफसफाई स्वच्छता मोहिमेत रस्त्यावर उतरले होते विविध ठिकाणी साचलेला चिखल दलदल कचरा उचलून स्वच्छता करून देण्याच्या दृष्टीने स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोकणातील कणेरी मठाचे सेवेकरी मदत कार्यात उतरले होते या मदत कार्यनंतर स्वामी महाराज यांच्या संकल्पनेतून शहर व ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांच्या घराची पूर्णतः नुकसानी झाली आहे अशा पूरग्रस्त बांधवांना यांना सिद्धगिरी मठ कणेरी जि. कोल्हापूर आणि लुपिन फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने चांगल्या दर्जाची घरे बांधून देण्यात येणार आहेत रविवार दि.२१ ऑगस्ट रोजी स्वामी महाराज यांनी शंकरवाडी, मुरादपुर ,कुंभारवाडी, भोईवाडी, वडार कॉलनी तसेच शहर व ग्रामीण भागात स्वतः फिरून नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली या आधी मठाच्या वतीने सेवेकरी मंडळींची टीम पाठवून सर्वे करण्यात आला होता.या संपूर्ण सेवा कार्यात चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम चिपळूण चे उपविभागिय अधिकारी प्रवीण पवार यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.यावेळी लुपिन फाउंडेशन चे मुख्य समन्वयक योगेश प्रभू ,भगवान लोकरे महाराज, जि.प सदस्य राजेंद्र ( बापू) आंब्रे, खेड पंचायत समिती उपसभापती जीवन आंब्रे, चिपळूण पंचायत समिती उपसभापती प्रतापराव शिंदे ,जि. प सदस्य अरविंद चव्हाण ,जि.प सदस्य सुनील मोरे ,चिपळूण पंचायत समिती सदस्य नितीन (आबू ) ठसाळे चिपळूण मधील नामवंत वास्तुविशारद दीलीप देसाई , नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, सेवेकरी प्रमोद शिंदे,मंडळ अधिकारी युवराज राजेशिर्के,राकेश देवळेकर, विकी लवेकर ,सचिन शिंदे ,विष्णू सुर्वे ,सुधीर महाडिक, संजय जाधव, सुभाष चाळके, प्रमोद शिंदे ,जितेंद्र शिंदे, बंड्या कानडे, गणेश ठाकूर ,गणेश कांबळी ,प्रकाश पवार आदि मान्यवर उपस्थित होते. चिपळूण मधील नामवंत वास्तुविशारद दिलीप देसाई यांच्या संकल्पनेतून या घरांची उभारणी होणार आहे
महापुरात घरांचे संपूर्ण नुकसान झालेल्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या कुटुंबांना घरे बांधून देण्याच्या सिद्धगिरी मठाच्या या संकल्पात दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहकार्याचा किंवा बांधकासाठी लागणाऱ्या आवश्यक मटेरियल यांची मदत करण्यासाठी श्री.प्रमोद शिंदे गुरुकुल फाउंडेशन यांच्याकडे संपर्क करावा असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्क नं : ९९३०६२९७३९
फोटो : पूर्णत:ह नुकसान झालेल्या घरांची पाहणी करताना सद्गुरु श्री काडसिद्धेश्वर महाराज आणि सेवेकरी छायाचित्रात दिसत आहेत. तसेच चिपळूण मधील नामवंत आर्किटेक्ट श्री दिलीप देसाई यांना घरांच्या रचने संदर्भात मार्गदर्शन करताना काडसिद्धेश्वर महाराज छायाचित्रात दिसत आहेत(छाया : ओंकार रेळेकर)
Post a Comment