संजय खांबेटे : म्हसळा
शेतकरी आपल्या शेतजमिनीच्या उताऱ्यांवर (७/१२ ) पिकांची नोंद करण्याची ही पद्धतआहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्जही दिले जाते. मात्र दोन तीन गावांमध्ये मिळून एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नाही, असा शेतकऱ्यांचा कायम आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने आपल्या पिकाची रिअल टाइम नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाने यासाठी स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशन निर्मिती केली असल्याने शेतकऱ्याना आपल्या शेतीतील पीक पाहणी जलद,वस्तुनिष्ठ व पारदर्शी होण्यास मदत होईल, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या ७/१२ वर तो घेत असलेल्या पिकांच्या नोंदी असणे आवश्यक असते. सद्य:स्थितीत गाव नमुना १२ वर तलाठ्यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून पिकांची नोंद केली जाते. आता शेतकरीच आपल्या पिकाची नोंद या ॲपव्दारे करु शकणार आहेत.
टाटा ट्रस्टच्या सहाय्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनमध्ये शेतकरी पिकांची माहिती भरतील, तलाठी या पिकांच्या नोंदी तपासून घेतील. यामुळे पीक पेरणीची रियल टाइम माहिती अॅप्लिकेशनमध्ये संकलित होणार आहे. तसेच ही माहिती संकलित होताना पारदर्शकता येणार आहे.
महसूल विभागाचा ई-पीक पाहणी पालघर(वाडा)
नाशिक (दिंडोरी ),औरांगाबाद( फु लांब्री )नागपूर ( कामाठी), पुणे (बारामती),अमरावती (अचलपूर) परभणी (सेलू ), औरांगाबाद ( सिल्लोड),अहमदनगर (संगमनेर), व बीड जिल्ह्यांतील ११ तालुक्यातून असे १० जिल्हे व २० तालुक्यातून मागील वर्षापासून पथदर्शी कार्यक्रम सुरू आहे. हा प्रकल्प येत्या१५ ऑगस्ट पासून राज्यभर राबवण्यात येणार आहे. याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
"ई - पिक पहाणी ॲप म्हणजे काय? मोबाईल व्दारे स्वताचे शेतातील उभ्या पिकाची माहीती आक्षांश -रेखांश दर्शविणाऱ्या पिकाचे छायाचित्रासह केलेली स्वयंघोषणा होय"
सुजय कुसाळकर, कृषी पर्यवेक्षक , कृषी विभाग , म्हसळा
"जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील तालुका मास्टर ट्रेनर, तलाठी, कृषी सहायक यांची प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन भवन येथे नुकतीच पार पडली."
Post a Comment