संजय खांबेटे : म्हसळा
सुमारे १५ दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळ पासून पावसाने सुरवात केली. तब्बल १५ दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होता. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३६०० मि.मि.आहे. तालुक्यात आजपर्यंत २८३४ मि.मि पावसाची नोंद झाल्याचे निवासी नायब तहसीलदार के. टी. भिंगारे यानी सांगितले. मागील१५ दिवसांत तालुक्यात केवळ १२१ मि.मी. पाऊस पडला. ऐन पावसाळ्यात उन्हाची एवढी तीव्रता वाढली होती की, तालुक्यातील भात, नागली, वरी या पिकांवर ऊन्हाचा परिणाम होण्याचे आत पाऊस सुरु झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला.मागील ५ वर्षाची सरासरी पहाता आजही तालुक्यात सुमारे ५०० मि.मी. पर्जन्यमान जास्त आहे.
"पंचांग .शास्त्रानुसार आत्ता अश्लेषा नक्षत्र सुरू आहे. नक्षत्राचे वाहन मोर आहे,१६ ऑगस्ट पासून मधा नक्षत्र सुरु होत आहे त्याचे वाहन गाढव आहे.या काळांत कोकणातील शेतीला आवश्यक पर्जन्यमान होणार आहे."
"प्रादेशकि हवामान केंद्र, मुंबई यांनी जारी केलेल्या अंदाजानुसार राज्यात पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी माहिती शास्त्रज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे."
Post a Comment