रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील रोहिणीगाव ग्रामस्थ मंडळाने ..अन्नधान्य किट डोक्यावर घेऊन 3 किलोमीटर चालत जाऊन केली मदत.
महाड : प्रतिनिधी
22 जुलै ला झालेल्या अतिवष्टीमुळे कोकणात महापूर आला.त्यात कोकणात सर्वत्र दरडी कोसळल्या.एक पाऊल माणूस म्हणून माणुसकीसाठी या विचाराने प्रेरीत होऊन बांधवांसाठी एक हात मदतीचा म्हणून रोहिणी गावं ग्रामस्थ विकास मंडळ स्थानिक व मुंबई मंडळाने पुढे करायचा ठरवला. आणि मदत गोळा करायचा सुरवात केली. ती झाली सुध्दा ती जमा मदत महाड तालुक्यातील वांद्रे कोडं गावात पिंपळवाडी गावात शेंडगे वाडी व बौद्ध वाडी या ठिकाणी अन्नधान्य किट,नवीन साड्या,सर्व वृध्द मातांना नववारी व रुमाल देण्यात आले. पिंपळवाडी गावात रोहिणी ग्रामस्थांनी स्वतःच्या डोक्यावर किट्स घेऊन खाच- खळग्यातून पाया वाट करत पोचलो या गावाचा संपर्क इतर गावांशी जवळ जवळ 12 दिवस तुटला अजुनही रस्त्याचं काम चालू आहे.सर्व ग्रामस्थ सांगत होते की तुम्ही पहिले आहात ज्यांनी आमच्या पर्यंत ही मदत पोचवली.वांद्रे कोडं व पिंपळवाडी ग्रामस्थांनी रोहिणी गावं ग्रामस्थ मंडळाचे आभार मानले व पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावर गावचे अध्यक्ष सुनील पाटील, सेक्रेटरी महिंद्र पाटील, कार्यकर्ते हरिश्चंद्र नाक्ती यांनी सर्व तरुणांनी समाधान व्यक्त केले की ही मदत खऱ्या गरजुंपर्यंत पोचली. सर्व वांद्रे कोडं व पिंपळवाडी ग्रामस्थांचे ही सेवा करण्याची संधी दिल्या बद्द्ल आभार मानले. ज्यांनी ह्या मोहिमेमध्ये स्वतःच्या परीने आर्थिक व वस्तू स्वरुपात मदत व सहकार्य केले अश्या सर्वांचे आभार मानले.व पुढेही रोहिणी गावच्या माध्यमातून असेच सामाजिक कार्य हाती घेतले जातील याची शाश्वती दिली.
Post a Comment