राष्ट्रवादी महिला आघाडीने पोलिसांना राखी बांधून साजरी केली राखी पौर्णिमा

म्हसळा
बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करण्याचे प्रकार दुर्मिळच म्हणावे लागतील. रविवारी भावा-बहिणीच्या प्रेमाचा राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. म्हसळा राष्ट्रवादी महीला आघाडीच्या तालुका अध्यक्षा रेश्मा कानसे आणी सभापती छाया म्हात्रे यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राखी बांधून अगळ्या पद्धतीने हा सण सादरा केला.यावेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष शगुप्ता जहांगीर आणी सकलप सरपंच वनिता खोत उपस्थीत होत्या. सभापती छाया म्हात्रे आणी रेश्मा कानसे यांनी राखी पौर्णिमेनिमित्त म्हसळा शहरातील पोलिस ठाण्याला भेट दिली. येथील सर्वच कर्मचाऱ्यांना त्यांनी औक्षण करीत राख्या बांधल्या.  राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या या उपक्रमामुळे पोलिस बांधव देखील भारावून गेले. पोलिस बांधव २४ तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी बांधली. यामध्ये एक वेगळी आनंदाची अनुभूती मिळाली. आपल्या शहरातील सर्व माता भगिनीचे आजपर्यंत रक्षण करीत आहात तसेच रक्षण करावे, अशी ओवाळणी यावेळी मागितल्याचे रेश्मा कानसे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा