संजय खांबेटे : म्हसळा
रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रा.पा.पु.म्हसळा उपविभागात उप अभियंता पदावर कार्यरत आसलेल्या युवराज गांगुर्डे यांची काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ग्रा. पा.पु.कणकवली उप विभागात उप अभियंता पदावर बदली झाली होती तीला स्थगिती मिळून त्यांची पुन्हा रायगड ग्रा. पाणी पुरवठयाचे उपअभियंता रोहा या रिक्त पदावर नियुक्ती झाली आहे.गांगुर्डे यानीश्रीवर्धन-म्हसळा या दोन तालुक्यात काम करताना रानवली,बागमांडला, गाळ सुरे, पानवे,सुरई,मांदाटणे, तोंडसुरे प्रा.न. पा.पुरवठा योजनांची कामे त्यानी व कर्मचाऱ्यानी अत्यंत सकारात्मक पध्दतीनी हाताळल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. दोनही तालुक्यातील अनेक नळपाणी पुरवठा अनेक जुन्या नळ पाणी पुरवठा योजना जल जिवन व पुर्न जोडणी अंर्तगत प्रस्तावित केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
Post a Comment