तळाः किशोर पितळे
तालुका निर्मिती होऊन२१वर्षाचा कालावधी लोटलाअसुन याकाळात अनेक वेळा स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे याची मागणी तळा पत्रकार संघ तालुका समन्वयक समीती व पोलीस अधीक्षक सो.अलिबागयांच्याकडे पाठपुरावाकरीत होते. शहरापासून दिड कि.मी अंतरावर असल्याने रात्री अपरात्री ग्रामीण भागात घटना घडल्यानंतर काळोखातून यावे लागत होते. सदर वास्तव निदर्शनास आणूनदेऊन तालुक्याला शोभेलअसे पोलीस ठाणे, पोलीस कर्मचारी वसाहतीची मागणी केली जात असताना शासनाने नगरपंचायत हद्दीतील सि.सर्वे नं.१२९९ जवळ पास ७ गुंठे जागा पोलीस ठाणे कडे हस्तांतरित केली जात असल्याने शहरालगतअत्याधुनिक पध्दतीचे सर्व सोईयुक्तपोलीस ठाणे लवकरच इमारत उभी रहाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे इतके वर्ष जागे अभावी पोलीस ठाणेची होणारी धुसमट मोकळा श्वास घेईल.यापूर्वी तहसील कार्यालयात पोलीस ठाण्याला तातडीने जागा उपलब्ध करून दिली होती पंरतु इमारत उभारणीतपोलीसठाणेचानियोजन केले गेले नसल्याने सबरजिस्ट्रेशन कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर भाड्याने जागा पोलीस ठाणे साठी घ्यावी लागली असणाऱ्या प्रतीकुल परिस्थितीत स्विकार करीत कसा तरी गाडा हाकलीत होते आता मात्र मोकळ्या जागेत होत आहे.हे तालुक्याच्या विकासात एक महत्त्वाचे पाऊल पुढे होत आहे. या बरोबरच शासकीय कर्मचारी वसाहत, स्वतंत्र भूमीअभिलेख कार्यालय,तालुका कृषी अधिकारी कार्यालय अजूनही भाड्याने थाटलेली असून त्यांचा शासनाने जरूर विचार करून निर्णयघ्यावा. अशी देखील मागणी केली जात आहे.
मा.जिल्हाधिकारी सो.यांच्या आदेशानुसार तातडीची शासकीय जागेची मोजणी करण्यात आली असून हद्द कायम करण्यात आली आहे.त्याप्रमाणे नियमाप्रमाणे पुढील कार्यवाही होईल.
आर के दिवेकर, उप अधिक्षक भुमी अभिलेख तळा. रायगड
Post a Comment