रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अग्निशमन दलातील बांधवांचा सन्मान
तालुका अध्यक्षा सौ. प्रितम पाटील यांचा स्तुत्य पुढाकार
रोहा (वार्ताहर)
जनसामान्यांच्या रक्षणार्थ अहोरात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बंधू रूपात कार्यरत असणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसाठी रोहा तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे अध्यक्षा सौ. प्रितम पाटील यांच्या पुढाकारातून रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राखी बांधून त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळीमहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यतत्पर अध्यक्षा सौ.प्रितम पाटील , सुवर्णा रहाटे सरपंच धाटाव,गीता मोरे ,सुविधा भोकटे,नेहा भोकटे,शुभांगी माने,उत्तरा म्हसकर, प्रिया मोरे, कल्पना मोरे, ज्योती डाके,स्नेहा ताडकर,रोशनी बेर्डे अपर्णा कोंडे,व सर्व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.अग्नीशमन दलाचे प्रमुख घरत साहेब तसेच जवान उपस्थित होते.
सौ. प्रितम पाटील आणि सर्व सहकारी महिला भगिनींचे या स्तुत्य उपक्रमासाठी सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment