संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यांत सर्पदंश,श्वानदंश व विंचू दंशाच्या घटनात वाढ होत असतानाच माकड,उंदीर आणि मधमाशा चावल्याचा घटना घडल्या, तालुक्यात कुत्र्यांनी तब्बल ७७ लोकांचे चावे घेतल्याचे पुढे येत आहे. या सर्वांवर एकमेव ईलाज शासकीय रुग्णा लयात होत आसतो,तालुक्यात ग्रामिण रुग्णालय म्हसळा,प्रा.आ.केंद्र म्हसळा, मेंदडी व खामगाव येथे बहुतांश रुग्णांवर इलाज झाला आहे.पावसाळ्यात बिळांमध्ये पाणी साचते. त्यामुळे साप बाहेर पडतात. याच काळात शेतीची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतात.त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण वाढते.जिल्ह्यात यावर्षी अतिवृष्टी झाली. वादळी पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ही सर्प दंशाच्या घटना वाढल्या आहेत. तालुक्यात १ एप्रिल ते आजपर्यंत ग्रामिण रुग्णालय म्हसळा येथे सर्पदंश ३१, श्वानदंश ७३ व विंचू दंशाच्या ३९ व अन्य ३ (माकड, मधमाशी व उंदीर) अशा घटना घडल्या,प्रा. आ.केंद्र म्हसळा,मेंदडी व खामगाव मिळून सर्पदंश ३,श्वानदंश ४ व विंचू दंशाच्या १३ व अन्य दंशाच्या १० घटना घडल्या आहेत . विविध दंशावर होणाऱ्या उपाय योजनेत प्रा.आ.केंद्रापेक्षा ग्रामिण रुग्णालयांत उपचार झालेल्यांची संख्या आधिक आहे.
गैरसमज व अंधश्रद्धा
धोकादायक सापाचे व अन्य देशाचे विष मंत्राने उतरते.कडुलिंबाचा पाला व मिरची खाल्ल्यास प्रकृती सुधारते,सर्पदंशझालेल्या जागेवर औषधी वनस्पती उगाळणे किंवा बिया वगैरे खायला देणे,सर्पदंशाच्या ठिकाणी गरम केलेल्या लोखंडाने डागण्या देणे,यासारखे अनेक गैरसमज-अंधश्रद्धा शहरी व ग्रामीण भागात आजही आहेत.हे सर्व उपाय निरर्थक व वेळ वाया घालविणारे आहेत. असे केल्यास व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होतो. तालुक्यातील मेंदडी व अन्य भागात घडल्याच्या घटनाही आहेत. सर्पदंशाची घटना घडल्यानंतर गावठी उपचार किंवा मांत्रिकावर विश्वास न ठेवता रुग्णालयात दाखल केल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो या बाबत तालुक्यांत बऱ्यापैकी जनजागृती झाली आसल्याचे १८गाव आगरी समाजाचे माजी अध्यक्ष महादेव पाटील यानी सांगितले.
"ग्रामिण रुग्णालयांत ग्रामिण रुग्णालय आधिक्षक नाव व मोबा.नंबर,सेवेत असणा ऱ्या वैद्यकीय अधिकारी यांचे नाव व मोबा. नंबर,तसेच सेवेत आसणाऱ्या नर्स वैद्यकीय अधिकारी यांचे नाव व मोबा.नंबर आणि O.P.D. ची वेळ याबाबत माहीतीचा फलक असणे आवश्यक आहे."महादेव पाटील, मा. सभापती पं.स. म्हसळा
Post a Comment