संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा तालुक्यात खाजगी शाळांनी केलेल्या शुल्कवाढी व सक्तीच्या फी वसुलीबाबत पालकां ची संभ्रमावस्था याच बरोबर शाळांतील विविध गैरप्रकारांबाबत अनेक तक्रारी शिक्षक, पालक यांच्याकडून होत आहे.मात्र त्या सोडविण्यासाठी तालुक्यात वरीष्ठ पातळीवर अधिकारीच नसल्या चे वृत्त आहे.तालुका शिक्षण विभागांत गट शिक्षणाधिकारी १, कानिष्ठ विस्तार अधिकारी २, शालेय पोषण अधिक्षक १ ,केंद्रप्रमुख ९, मुख्याध्यापक ५, पदवीधर शिक्षक ५२, उपशिक्षक २४ ( ऊर्दु २,मराठी २२)अशी ९४ पदे रिक्त आहेत. तर तालुक्याच्या माध्यमिक शिक्षण विभागा साठी तालुका स्तरावर स्वतंत्र यंत्रणा नाही. प्राथमिक शिक्षण विभागाचीच यंत्रणा माध्यमिक साठी वापरली जाते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ही सर्वच पदे तातडीने भरणे गरजेचे असल्याचे मत तालुक्यातील पालक वर्ग व्यक्त करीत आहेत.तालुका शिक्षण विभागांत प्राथमिक शाळा १००, माध्यमिक शाळा २० आहेत. तालुका पंचायत समितीचे सहाय्यक ग.वि.अधिकारी राजेश कदम याना शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या गट शिक्षण अधिकारी पदाची आतिरीक्त जबाबदारी दिल्याने त्यांच्यावर दोन विभागाच्या कामकाजा चा भार रहाणार आहे. अन्य रिक्त पदांवरही प्रभारी नेमणूका होऊन म्हसळा तालुक्याची भलावण होण्याची शक्यता आहे.
" रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात सर्वात जास्त रिक्त पदे म्हसळा तालुक्यात आहेत.जिल्हा प्रशास- नाने म्हसळा तालुक्यातील रिक्त पदे तात्काळ भरावी, तालुका पातळीवरील लोकप्रतिनिधींचा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व मुख्य कार्यकारी आधिकारी यांचेकडे संर्पक व पाठपुरावा असणे आवश्यक आहे"
महादेव पाटील, माजी सभापती,पं.स. म्हसळा.
" राज्य शासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्याचे ठरविल्यास गट शिक्षणाधिकारी, कानिष्ठ विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुखखांची रिक्तपदे घेऊन शिक्षण विभागाचा डोलारा सांभाळणे कसरत होणार आहे.ती पदे भरण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमांतून प्रयत्न करणार"
राजेश कदम .प्रभारी गट शिक्षणाधिकारी, पं.स. म्हसळा.
Post a Comment