महिला सक्षमीकरणासाठी येणाऱ्या काळात सर्वतोपरी प्रयत्न करणार-सौ. प्रितम पाटील



रोहा (वार्ताहर)
स्त्री सक्षमीकरण ही ग्रामीण भागातील सध्याच्या काळाची मोठी गरज असून ग्रामीण भागातील स्त्रियांना संघटीत करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी रायगडच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार तालुक्यातील धडाडीच्या महिला कार्यकर्त्या रोहे तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी अध्यक्षा सौ. प्रितम पाटील यांनी व्यक्त केला.
 वरसगाव येथे ग्रामसंघांनी लावलेल्या महिला बचत गटाच्या स्टॉलला त्यांनी सोमवारी भेट दिली त्यावेळी त्या बोलत होत्या.

 ग्रामीण भागातील महिला भगिनींमध्ये काम करण्याची प्रचंड ऊर्जा व कौशल्य आहे याचा उपयोग त्यांच्या सक्षमीकरणासाठी व्हावा यासाठी येणाऱ्या काळात विशेष प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या मार्गदर्शनामधून सौ. प्रितम पाटील यांनी उपस्थीत सर्व महिलांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा व नवीन ऊर्जा दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत वरसगाव सरपंच विशाखा राजिवले व अन्य महिला पदाधिकारी उपस्थीत होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा