सेवा तात्काळ सुधाराव्या शिवसैनीकांची मागणी
संजय खांबेटे : म्हसळा
हल्ली विजसेवा म्हणजे अत्यावश्यक सेवाअसून म्हसळा शहरांत व ग्रामिण भागात सतत विजपु- रवठा खंडीत होत आसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.तालुक्यात सुमारे १९ हजार २५६ ग्राहक आहेत यामध्ये घरगुती,व्यापारी,औद्योगि- क या सर्व प्रकारचे ग्राहक आहेत.तालुक्यातील सर्व ग्राहकांच्या म.रा.वि.वितरण कंपनी विरुद्ध जोरदार तक्रारी आहेत त्यामुळे या सर्व ग्राहकां साठी शिवसेना पुढे सरसावली असून म.रा. वि.वितरण कंपनीने आपल्या सेवेत तात्काळ सुधारणा कराव्या,येणारी भरमसाठ वाढीव विजबिले, ग्रामिण भागात आंबा- काजू बागा- यतीत चुकीचे वीज वाहनामुळे लागणारे वणवे ह्या सर्व प्रकाराना तात्काळ निर्बंध घालावे, ग्रामिण भागातील पथदिवे तात्काळ सुरु करावे, कर्मचारी -iआधिकाऱ्यiचा उध्दटपणा थांबवावा अशा मागण्या स्थानिक शिवसेनेने तहसीलदार, पोलीस निरीक्षक,ग.वि.अ.पंचायत समिती म्हसळा व उपअभियंता म.रा.वि.मं.यांच्याकडे दिले आहे.
निवेदन देण्यासाठी माजी सभापती महादेव पाटील, रविन्द्र लाड,कृष्णा म्हात्रे,विरेंद्र सावंत, पांडुरंग सावंत,अनंत शेडगे,हेमंत नाक्ती, वितास खेडेकर, मेघश्याम खेडेकर आदी शिवसैनिक होते.
Post a Comment