फोटो- पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते कोरोना योद्धाचे प्रशस्ती पत्रक स्वीकारताना डॉक्टर व कर्मचारी दिसत आहेत.
कोरोना महामारीत आमचा एक विभाग कुठलीही भीती न बाळगता कार्यरत राहिला तो म्हणजे आरोग्य विभाग:पालकमंत्री अदिती तटकरे
म्हसळा(निकेश कोकचा)
कोरोना महामारीत शासनाच्या सूचनांचे पालन करीत सर्व जन आपापल्या घरी बसले होते.लॉकडाऊन मध्ये कोणतेही व्यवसाय काम करता येत नव्हते.नोकरी व्यवसाय ठप्प होते,या गोष्टीची मोठी अडचण होती मात्र असे असताना देखील आमचा एक विभाग कुठलीही भीती न बाळगता कार्यरत राहिला तो म्हणजे आरोग्य विभाग आहे असे म्हणत जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांनी म्हसळा आरोग्य विभागाचे कौतुक केले.
शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट रोजी म्हसळा पंचायत समिती हॉल मध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या सहीच्या प्रशस्ती पत्राचे कोरोना काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचार्यांना रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हापरिषद सभापती बबन मनवे,जिल्हा परिषद सदस्य धनश्री पाटील,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष नाझीम हसवारे,पंचायत समिती सभापती छाया म्हात्रे,उप सभापती संदीप चाचले,सदस्य उज्वला सावंत,सदस्य मधु गायकर,तहसीलदार शरद गोसावी,तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत गायकवाड,सहायक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे,सहायक गट विकास अधिकारी राजेश कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य कर्मचारी व आशा यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी पार पाडत स्वताच्या कुटुंबाची व स्वताच्या आरोग्याची भीती न बाळगता घरो घरी जाऊन योजना प्रभावी पणे राबवली.एकीकडे कोरोन रुग्ण सांभाळणे तर दुसरीकडे लसीकरणाची मोहीम यशस्वीपणे हाती घेणे यामुळे आरोग्य विभागाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे अशी भावना पालकमंत्री अदिती तटकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर प्रियांका देशमुख,डॉक्टर नेहा पाटील, खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर प्राजक्ता पोटे,मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर विशाल भावसार,डॉक्टर पूजा डोंगरे,डॉक्टर चारुशीला गायकवाड यांनी आपापल्या कर्मचाऱ्याच्या वतीने पशस्तीपत्र स्वीकारले.कार्याकार्माचे सूत्र संचालन डॉक्टर नेहा पाटील व आयोजन तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत गायकवाड यांनी यशस्वी पणे पार पडल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment