धक्कादायक : तळा शहरातील महादेव तलावात इसमाची आत्महत्या.


तळाःकिशोर पितळे
तळा शहरातील गुरव आळीतील हरिहरेश्वर मंदिरा समोरील महादेव तलावात गणेश दगडु शिर्के या ५३वर्षीय इसमाने आत्महत्या करून जीवन संपवले. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मयत गणेश यांचे वर्षभरापासून शारीरिक आजाराने  त्रस्त होते तसेच यांनी नशापान ही केली होती काल ता. १८ आँगस्ट रात्री ७ ते१० दरम्यान कोणालाही न सांगता घरातून निघून गेला सगळीकडे शोधा शोध केली असता. आज सकाळी तलावात ११वा. आढळून आला. अशी माहिती पत्नी रेश्मा ग. शिर्के यांनी दिली तळा पोलीस ठाण्यात अचानक मृत्यू र.जि.नं. ५/२०२१ नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे यांचे मार्गदनाखाली पो.ना.१०१८ सानप करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा