रायगड जिल्ह्यांतील अधीक्षक रायगड यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गत ३७८ पोलीसकर्मचाऱ्याची बदली



संजय खांबेटे : म्हसळा 
रायगड जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक रायगड यांचे कार्यक्षेत्राअंतर्गत३७८ पोलीसकर्मचाऱ्याची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार आस्थापना मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस अधीक्षक रायगड यांच्या कार्यालयातील पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय, वाहतूक शाखा,आर्थिक गुन्हे शाखा मधील कालावधी पूर्ण केलेल्या व विनंती केलेल्या पोलिसांची बदली प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे.सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तपासणीअंती पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या व विनंती नुसार  ३८१ कर्मचाऱ्यांची यादीला १२ ऑगस्ट रोजी मान्यता देण्यात आली.
"म्हसळा पोलीस स्टेशनमधील १३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हयात अन्यत्र झाल्या तर म्हसळयात जिल्ह्यातून ७ कर्मचारी बदलून येणार आहेत. तालुक्यातून जाणारे व येणारे कर्मचारी पुढील प्रमाणे जाणाऱ्या पुढे कंसात बदलीचे ठीकाण व येणाऱ्यांपुढे कंसात येणारे ठीकाण आहे. जाणारे :सपोउनी चंद्रकांत बोरकर (पेण), पो.ह.सुरेश मोरे (खोपोली),रामदास सुर्यवंशी(पेण),मिलींद सुर्वे (मुख्यालय), पो.ना.कैलास होडशीळ (वाहतुक शाखा) पो.ह.वैभव पाटील,(मांडवा),मंगेश पाटील (मांडवा) ,संजय सताणे (वाहतुक शाखा), मनिषा पाटील (मुख्यालय),पो.ना.सुर्यकांत जाधव (मुरुड),आर्यशील मोहीते (रसायनी) स्वाती ओंबासे(दिघी सागरी), राहुल साबळे (वाहतुक शाखा),
येणारे पो.ह. सुरेश रामचंद्र पाटील,पो.शि.बालाजी आरसेवाड.(वाहतुक शाखा),राजेंद्र म्हात्रे (माणगाव),कल्पेश नलावडे(रेवदंडा),पो.ना. मनिष म्हात्रे (रसायनी)

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा