कमळ नागरी पतसंस्थेच्या रोहा शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न

 



रोहा (वार्ताहर)


कोकणातील सहकार  क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असलेल्या कमळ नागरी पतसंस्थेच्या कमळ नागरी पतसंस्थेच्या रोहे शाखेचे साई मुकुंद हाईटस (मेहेंदळे हायस्कूल जवळ)येथे स्थलांतर झाले.
रोह्याचे प्रथम नागरिक संतोष पोटफोडे यांच्या शुभहस्ते स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून फीत कापून नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ नेते तसेच प्रतिथयश व्यवसायिक श्री. विजयराव उर्फ बंधु मोरे, साई मुकुंद हाईटसचे विकसक तसेच रोहे अष्टमी नगरपालिकेचे सभापती महेंद्र दिवेकर, सोहीत कांकरीया, जमीन मालक माधवराव दाते यांचे प्रतिनिधी निखिल दाते व एड. पल्लवी दाते,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग आदी मान्यवर व संस्थेचे  अध्यक्ष सतीशचंद्र पाटील, संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे,उपाध्यक्ष संतोष पुरो,सचिव सौ. गीतांजली ओक, संचालक आनंद करबत,प्रवीण जैन, अजित नाईक, राजेंद्र प्रधान, संचालिका सौ. स्नेहा गांधी, शाखा व्यवस्थापक दिलीप पाटील उपस्थित होते.

संस्थेचे रोह्यातील  सभासद,हितचिंतक व ग्राहकांनी या नवीन वास्तूच्या प्रवेशानिमित्ताने कमळ नागरी पतसंस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी आपल्या मनोगतामध्ये कमळ नागरी पतसंस्थेच्या आजवरच्या वाटचालीचे विशेष कौतुक करून रोह्यातील युवकांना नवीन व्यवसायासाठी संस्थेने अग्रक्रमाने पतपुरवठा करावा असे आवाहन यावेळी केले.

संस्थेचे अध्यक्ष सतीशचंद्र पाटील यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा गोषवारा उपस्थितांसमोर मांडला.
उपाध्यक्ष श्री. संतोष पुरो यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा