संजय खांबेटे : म्हसळा
कोरोना विषाणूची पार्श्वभूमी विचारात घेता
आजचा स्वातंत्र्य दिनाचा ७४ वावर्धापनदिन म्हसळा शहरांत उत्साहात साजरा झाला. तालुक्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांचे हस्ते. पोलीस स्टेशन म्हसळा येथे A.P.I. उध्दव सुर्वे यांचे हस्ते,नगरपंचायतीचे ध्वजा रोहण म्हसळा तालुका निवासी नायब तहसीलदार के.टी. भिंगारे यांचे हस्ते, पंचायत समिती म्हसळा येथे सभापती छाया म्हात्रे यांचे हस्ते.प्रा.आ.केंद्र म्हसळा येथे वैद्यकिय आधिकारी श्रीमती प्रियांका देशमुख यांचे हस्ते ,न्यू इंग्लीश स्कूल म्हसळा येथे प्राचार्य प्रभाकर मोरे यांचे हस्ते ,प्रा.आ.केंद्र खामगाव येथे वैद्यकिय आधिकारी श्रीमती गीतांजली हंबीर यांचे हस्ते,सार्वजनिक वाचनालय म्हसळा येथे वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे यांचे हस्ते.प्रा.आ.केंद्र मेंदडी येथे जि. प. सदस्या श्रीमती धनश्री पाटील यांचे हस्तेध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहरासह तालुक्यांत स्वातंत्र्यदिनाचा संपूर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर (Social Distancing) व कोव्हीड १९ संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न झाला.आयोजकानी मोजक्या च मान्यवरांना निमंत्रित केले होते.
तालुक्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण तालुक्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शरद गोसावी यांचे हस्ते
२)सार्वजनिक वाचनालय म्हसळा
३)प्रा.आ. केंद्र म्हसळा.
Post a Comment