संत निरंकारी मिशनच्या सेवा कार्याचा सन्मान : महाड येथील पूरग्रस्तांच्या मदतीला धावल्याने पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार
कोविड सारख्या वैश्विक महामारीच्या काळात कुठलीही भीती न बाळगता पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्यामुळे तसेच आपत्कालीन परिस्थितीत केलेली कामगिरी निश्चितच महत्त्वपूर्ण व दखलपात्र असून केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर भावनिक व सामाजिक जबाबदारीने अहोरात्र मदत केली यासाठी संत निरंकारी मिशनचे जिल्हा प्रशासनातर्फे आभार व्यक्त करीत आपत्तीच्या काळात मदत कार्यास तत्परतेने धावून येण्याची ही परंपरा यापुढेही कायम ठेवावी अशी अपेक्षा प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड शहर व परिसरात महापुराच्या नैसर्गिक महाभयंकर आपत्तीच्या प्रसंगी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन कृपाशीर्वादाने रायगड (खरसई) झोन 40/A च्या अंतर्गत येणाऱ्या सेवादल क्षेत्राचे-क्षेत्रीय संचालक, मुंबई क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक, संचालक, समस्त सेवादल अधिकारी गण व सेवादल बंधू-भगिनी तसेच झोन मधील संयोजक, मुखी, मिडिया सहाय्यक, साध संगत मधील सर्व सक्रिय संत महात्मा भगिनी यांनी पूरग्रस्त मानव परिवाराची अत्यंत निष्ठेने व आत्मीयतेने मानवतेच्या दृष्ठीकोनातून सेवा केली. त्या सेवेची दाद जिल्हा प्रशासनाने घेऊन भारतीय स्वातंत्र्य दिनी अलिबाग येथे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते संत निरंकारी मंडळाला सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
रायगड 40 A झोनचे झोनल प्रबंधक प्रकाश म्हात्रे व सेवादल क्षेत्र रायगड क्षेत्रिय संचालक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मानवतेचे कार्य तब्बल 13 दिवस सुरू होते. पूरग्रस्तांच्या घरांमधील तसेच रस्त्यांवरील व शासकीय इमारतींमधील चिखल उपसण्यापासून ते कचरा व पूर्ण साफसफाई महाड शहरातील पूर्ण भागातील करण्यात आली आहे. त्यामुळे संत निरंकारी मिशनचा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला. हा सन्मान सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मानव सेवा कार्याच्या दिव्य मार्गदर्शनाचा सन्मान आहे. सदरच्या मानव सेवा कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहभागी झालेल्या सर्वांचे झोनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
Post a Comment