संजय खांबेटे : म्हसळा
पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट अंधत्व विविध प्रकारे टाळता येण्याजोगे असते ते निर्मूलनाच्या मिशनमध्ये या सेवाकेंद्राचे उद्घाटनआज साई क्लीनिक (स्टेट बँकेच्या शेजारी) मध्ये रायगडच्या पालक मंत्री ना. आदीती तटकरे यांच्या हस्ते झाले.यावेळी डॉ.सुहास हळदीपूरकर, नगराध्यक्षा जयश्री कापरे,श्रीमती जयंती हळदीपूरकर, डॉ.मोनिका सामंत,डॉ.हेतल शहा,डॉ.महेश मेहता,श्रीमती पल्लवी मेहता,सतीशचरखा, अलीशेठ कौचाली,बबनशेट मनवे,संजय कर्णिक,ओंकार पाटील,नाजीम हसवारे वगैरे मान्यवर होते.लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ.सुहास हळदीपूरकर, अत्यंत दर्जेदार सर्व समावेशक डोळ्यांची सेवा स्वस्त दरात आणि रुगणाकडे वैयक्तिक लक्ष देत असतात ह्याचा फायदा म्हसळयातील जनता त्याच बरोबरीने श्रीवर्धन, दिधी भागातील गरीब नागरिकाना होणार आहे. ही सर्व मंडळी ह्या केंद्राचा पुरेपूर फायदा घेतील असे सांगत ट्रस्टचे डॉ. सुहास हळदीपूरकर,विश्वस्त आणि वैद्यकीय संचालक राज्यात दृष्टिहीन व्यक्तीच्या जीवनात बदल घडवू शकतात यांच्या सेवा आता म्हसळा शहरात माफक दरात मिळणार आहेत.यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. म्हसळा केंद्राला एल & टी च्या C.S.R. फंडातून मदत होणार आहे. केंद्रात तपासणी केलेल्या रुग्णावर ट्रस्टच्या पाली येथील अद्ययावत हॉस्पीटल मध्ये माफक दरात मोतीबिंदू शस्त्रक्रियाकरण्यात येणार आहेत.मोती बिंदू,डोळयातील पडदा, काचबिंदू,बालरोग मोतीबिंदू,बालरोग स्क्विंट ,कॉर्नियल प्रत्या रोपण वगैर शस्त्र क्रिया होणार आहेत.
फोटो
फोटो : साई क्लिनिक मान्यवरोचे स्वागत करताना.
Post a Comment