स्वराज्य प्रतिष्ठानचे मावळे पूरग्रस्तांच्या मदतीला....!

स्वराज्य प्रतिष्ठानचे मावळे पूरग्रस्तांच्या मदतीला....!


 

स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संघटनेच्या वतीने दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी स्वराज्य प्रतिष्ठान रायगड  संस्थापक/ अध्यक्ष सन्मानीय भास्करभाई कारे यांच्या नेतृत्वाखाली  कोकणातील महाड पूरग्रस्त बंधू- भगिनींना एक हात मदतीचा पुढे करत निस्वार्थ भावनेने मदत करण्यात आली.

संस्थेच्या माध्यमातून त्या भागातील माहिती घेत, काही गोष्टी प्रत्येक्ष पाहत असे निदर्शनास आले की गेली 10 दिवस तेथील पूरग्रस्तांना रोजच्यारोज गरजेची असलेली जीवनावश्यक वस्तू वाटप करणे गरजेचे आहे. स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संघटनेच्या वतीने महिलांना साडी, पुरुषांना कपडे तसेच पाण्याच्या बॉटल्स, बिस्कीट, मेणबत्ती, झाडू, सुपडी, टॉर्च, साबण, फिनेल, ब्लॅंकेट, चादर, चटई इत्यादी वस्तू स्वरूपात वाटप करण्यात आले.




           त्याचप्रमाणे मदतीचा हाथ देत पूरग्रस्त बांधवाना दिलासा देत त्यांना धीर दिला. प्रत्येक्ष गावागावातून जात असताना लोकांच्या घरात जाऊन वस्तू स्वरूपात मदत करत असताना असे निदर्शनास आले की त्या भागात वीज, पाणी, अत्यावश्यक वस्तूंची नितांत गरज आहे, शासन प्रशासनाने त्वरित त्यावर लक्ष केंद्रित करावे.

          सरतेशेवटी आम्ही निःस्वार्थ भावनेने त्याठिकाणी गेलो त्याचा आम्हाला आनंद आहे. त्याचबरोबर कोकणातील या पूरग्रस्तांना आर्थिक स्वरूपात मदत केली तसेच वस्तू स्वरूपात मदत केली त्यांचे आम्ही स्वराज्य प्रतिष्ठान रायगड मनापासून ऋणी आहोत. त्याचबरोबर संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष सन्मानीय भास्कर भाई कारे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना संघटनेची कार्यकारणी सदस्य, संघटनेचे शिलेदार, युवती या मोहिमेत उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा