म्हसळ्यात घरफोडी : चोरटयाने मारला डेअरी साहीत्यावर डल्ला.

म्हसळ्यात घरफोडी : चोरटयाने मारला डेअरी साहीत्यावर डल्ला.


 


संजय खांबेटे : म्हसळा 

म्हसळा तालुक्यातील मेंदडी मध्ये चोरटयानी डेअरीमध्ये चोरी करून सुमारे रुपये१६हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. सदर चोरीची फिर्याद फाईज मुहीमुल्ला नाजीर वय ३२ रा. मेंदडी याने दिल्याने म्हसळा पोलीस स्टेशन च्या ठाणे अंमलदार स्वप्नाली पवार यानी गु.र.नं. ६०/२०२१ भा.द.वि.सं.कलम३८०,४६१ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.चोरीची घटना रवीवार दि.१ऑगस्ट रोजी सायं.६ ते सोम. दि.२ऑगस्ट सकाळी ९च्या दरम्यान घडल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.डेअरीच्या बंद गुदामात छताचा पत्रा सरकून सुमारे रु१५,४००चा ऐवज चोरल्याचे तक्रारीत सांगण्यात आले.घटनेचा तपास स.पो.नि.उध्दव सुर्वे यांच्या मार्गदर्शना खाली पो.हे.कॉ.रामदास सुर्यवंशी करीत आहेत. "मागील काही वर्षानंतर अशा पद्धतीची घरफोडी झाली आहे, म्हसळा पोलीस चोरट्याचे मार्गावर असून २४ तासात आरोपीला जेरबंद करतील "




Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा