कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ हा शिष्टाचार न ठरता संस्कृतीचाअविष्कार असतो : आमित शेडगे



संजय खांबेटे : म्हसळा

म्हसळा तालुका तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अन्य तालुक्यांत बदल्या झाल्यामुळे त्याना निरोप व तहसीलदार शरद गोसावी यांचे वाढदिवसा निमीत्त शुभेच्छा देण्यासाठी प्रांतआधिकारी अमित शेडगे यांचे उपस्थितीत तहसील कार्यालयांत आज छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी शेडगे यानी  कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ हा शिष्टाचार न ठरता संस्कृतीचा अविष्कार असतो त्यातून सकारात्मक संदेश समाजमनांत जात असतो असे भावनात्मक सांगितले. शेजारील तालुक्यात जाणाऱ्या आपल्या तालुक्यातील या तीनही कर्मचाऱ्यानी शासकीय सेवा करताना तालुक्यातील जनतेला दिलेली आस्थेवाईकपणाची वागणूक,ज्येष्ठ नागरिक,महिला यांना दिलेली सन्मानाची वागणूक,अन्य आधिकारी व कर्मचा-यांशी जपलेला जिव्हाळा आणि हे करीत असतांना पावलो पावली जपलेली कर्तव्यदक्षता हाच त्यांच्या पुढील सेवेसाठी आदर्श ठरणार आसल्याचे तहसीलदार शरद गोसावी यानी सांगितले, आस्थितानी अनेक आठवणींना बोलणा-या वक्त्यानी उजाळा दिला. यावेळी बदली झालेले पुरवठा अव्वल कारकून नथुराम सानप, उपलेखापाल जितेंद्र टेंबे,महसुल लिपिक गोविंदराव चाटे यांचा सत्कार व म्हसळा तहसील कार्यालयांत महसुल नायब तहसीलदार या रिक्त पदावर नियुक्त झालेले डी.जे.पाटील यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी,परि.तहसील - दार विपुल ढुमे,नि.ना.तहसीलदार के.टी. भिंगारे,सचिन धोंडगे,विशाल भालेकर, मंडळ अधिकारी सलीम शहा,दत्ता कर्चे, श्रीमती तृप्ती साखरे,एस.डी.लिमकर, गणेश महाडीक,महेश रणदिवे,नरेश पवार, तलाठी कैलास पाटील,श्रीमती कारंडे, माने,गजानन गिऱ्हे, शेळके, कळंबे, मांदळे,पाटील व बहुतांश कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा