रोहा (वार्ताहर)
रोहा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे जीवनावश्यक वस्तू व घरगुती गैस सिलेंडरच्या वाढत्या किंमतींच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे, रायगडचे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे, आ. अनिकेतभाई तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या दमदार अध्यक्षा सौ. प्रितम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन संपन्न झाले.
महागाईने ग्रस्त जनतेच्या यातनांकडे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेणाऱ्या मोदी सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.
सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने होरपळून निघाली असून केंद्र शासन मात्र याविषयी असंवेदनशील आहे याबाबत तालुका महिला अध्यक्षा सौ. प्रितम पाटील यांनी नाराजी व्यक्त केली व ऐन सणासुदीच्या तोंडावर नुकतीच करण्यात आलेली घरगुती सिलेंडरची दरवाढ तत्काळ मागे घेऊन महिला वर्गाला दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
यावेळी सौ. प्रितम पाटील यांच्यासमवेत धाटाव सरपंच सुवर्णा रटाटे, गीता मोरे, सुविधा भोकटे, नेहा भोकटे, शुभांगी माने, उत्तरा म्हसकर, प्रिया मोरे, कल्पना मोरे, ज्योती ताडकर, रोशनी बेर्डे, अपर्णा कोंडे आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थीत होत्या.
Post a Comment