बोर्लीपंचतन प्रतिनिधी
येणारे गोपाळकाला व गणेशोत्सव या सणांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थाअबाधित राहणाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक बोर्लीपंचतन येथील दिघी सागरी पोलीस ठाण्यात संपन्न झाली.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येणारे सण साजरे करीत असताना शासनाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन सर्व नागरिकांनी करावे,
कोरोना प्रसार अजूनही थांबलेले नाही तिसरी लाट आणखी भयानक असेल सण साजरे करताना नैतिक जबाबदारीचे भान राखावे जुने तंटे वाद टाळावे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आजपर्यंत केलेत तसे पोलीसांना सहकार्य करावे कोणतीही अनुचित घटना घडली तर कठोर कारवाई करण्यात येईल गुन्हेगारी प्रवृत्तीला पाठीशी घातले जाणार नाही.
कोरोना लसीकरणासाठी होणारी गर्दी याबबात योग्य नियोजन करावे अशी सुचना डॉ.सुरज तडवी यांना करण्यात आले याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण,पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे पोलीस नाईक संदीप चव्हाण डॉ.सुरज तडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील सर्व समाज व तंटामुक्ती अध्यक्ष मोहल्ला समिती सदस्य स्थानिक नेते सुकुमार तोंडलेकर, महंमद मेमन, शामकांत भोकरे,मंदार तोडणकर उपस्थित होते.
Post a Comment