पवन आडवळे सरानी म्हसळ्याची शैक्षणिकपरंपरा उंचावली : तालुक्यासह जिल्ह्यात होत आहे कौतुक.



संजय खांबेटे : म्हसळा 
जिल्हा परिषद कणधर शाळेतील शिक्षक पवन आडवळेसर  यांची "कोण होईल मराठी करोडपती"या कार्यक्रमासाठी निवड झाली,  पवन आडवळे सरानी म्हसळ्याची शैक्षणिक परंपरा उंचावली हा म्हसळा  तालुक्यातील शिक्षक , शिक्षण विभाग आणि म्हसळा तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे आहे. Sony मराठी चॅनेलवर सोमवार दिं.२४ व मंगळवार दिं.२५ ऑगस्ट रोजी प्रक्षेपित झालेल्या "कोण होईल मराठी करोडपती" या कार्यक्रमात यशस्वी होऊन रु १२ लक्ष ५० हजार रुपये मात्र बक्षीस मिळविले त्यांचे कौतुक गटविकास अधिकारी वाय.एन.प्रभे,प्रभारी गट. शिक्षणाधिकारी राजेश कदम ,पंचायत समिती सभापती श्रीमती छाया म्हात्रे,उप सभापती चाचले,माजी सभापती श्रीमती. ऊज्वला सावंत ,माजी उपसभापती मधुकर गायकर,जि.प.कृषी सभापती बबन मनवे, म्हसळा तालुक्यातील नितीन माळीपरगे अशोक सहाणे,गणेश अकोलकर,प्रशांत मोरे,महेंद्र गायकवाड,चंद्रकांत बैसाणे, अब्बास शेख,लाला लाडके आदी शिक्षक मित्र परिवार उपस्थित होते.आडवळे सर हे अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन आपल्या आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्या साठी परिश्रम घेत आहेत.आपल्या परिस्थितीचा विचार न करता त्यांनी म्हसळा तालुक्यातील डोंगराळ भागातील कणघर येथील अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.ते एक उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू असून राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक वेळा मल्लखांब प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना मल्लखांब खेळा विषयी आवड निर्माण करून अनेकविद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल  विजेते खेळाडू घडवलेआहेत.तसेच अशा गरीब मुलांसाठी ते आपल्या अतुल्य स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून  शेकडो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आणि सुविधा देत आहे.विद्यार्थी हेच आपले कुटुंब अशी धारणा समजून आपले काम उत्कृष्ट करत आहेत.सध्या म्हसळ्यात सुद्धा त्यांनी आपल्या नवोपक्रम आणि खेळाडू घडवण्याचा मानस व्यक्त केला आहे.अशा हुशार,जिद्दी,कष्टाळू, प्रामाणिक, शिक्षकाला नुकत्याच Sony मराठी चॅनेलवर प्रक्षेपीतझालेल्या कोण होईल करोडपती या मालिकेत जाऊन म्हसळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि म्हसळा तालुक्याचा नावलौकिक केला.म्हसळा हा गुणवंत, कलावंताचा तालुका आहे हे पुन्हा सरांच्या रूपाने सिद्ध केले. अशा शिक्षकाला तमाम म्हसळा वासीयांच्या वतीने कौतुक केले, आणि त्यांचा गौरव करण्यात आला.म्हसळा शिक्षकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि शुभेच्छा ही देण्यात आल्या. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा