श्रीवर्धन तालुक्यातील शिवसैनिकांचा नारायण राणे यांच्यावर निषेध

 शासनाने नारायण राणे यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करून अटक करावी - प्रतोष कोलथरकर

 श्रीवर्धन प्रतिनिधी : तेजस ठाकूर

      दि. २४ जुलै, केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाड या ठिकाणी आपल्या वाणीतून मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनुद्गार काढले व आक्षेपार्ह विधान केले. सदरच्या विधानाचे श्रीवर्धन तालुका शिवसेना संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करून या बाबत शिवसैनिकांच्या भावना या अतिशय तीव्र स्वरूपात दुखावलेल्या आहेत. सदरच्या जाहीर निषेधाचे निवेदन श्रीवर्धन तालुका शिवसेना संघटना यांनी श्रीवर्धनचे तहसीलदार व श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. सदरचे निवेदन देते समयी शिवसेना श्रीवर्धन तालुकाप्रमुख प्रतोष कोलथरकर यांनी म्हटले की, मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या बद्दल जे अनुद्गार काढले आहेत त्या बाबत शासनामार्फत नारायण राणे यांच्याविरोधात तात्काळ कारवाई होऊन त्यांस अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा शिवसेना पद्धतीने या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असे वक्तव्य  प्रतोष कोलथरकर यांनी केले. सदरच्या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना श्रीवर्धन तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर, माजी आमदार तुकाराम सुर्वे, गटनेते अनंत गुरव, श्रीवर्धन सभापती बाबुराव चोरगे, युवासेना अध्यक्ष शिवराज चाफेकर, बागमांडला विभाग प्रमुख सचिन गुरव, नगरसेवक प्रीतम श्रीवर्धनकर, राजेंद्र चव्हाण, सुनील दर्गे आदि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा