टीम म्हसळा लाईव्ह
महाड, पोलादपूर व रत्नागिरी जिल्हातील चिपळूण शहरामध्ये महापुराच्या पाण्याचा प्रवाह 20 फुटांपेक्षा जास्त आल्याने प्रवाहातील गाळ, चिखल, माती, दगड, झाडे झुडपे, प्राणी व अन्य कचरा, वाहने, घरातील वस्तु, किराणा दुकानातील नाशिवंत माल हा वस्तीत व रस्त्यावर पसरलेला आहे.
चिपळूण पूरग्रस्तांना मदतीसाठी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ, कणेरी, कोल्हापूर यांचे सुमारे १०० स्वयंसेवक भरगोस मदतीसह टीम चिपळूण येथे दाखल झाली आहे.
चला उभी करू आपल्या कोकणवासियांची घरे आणि मने...
चिपळूण,खेडमध्ये आलेला हा ४० वर्षातील सर्वात मोठा महापूर आहे. जवळपास ८६ जणांचा मृत्यू झालेला आहे. कित्येक घरे वाहून गेली आहेत. अनेक गावे पूरग्रस्त आहेत. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. हजारो हेक्टर कृषी जमिनीचे नुकसान झाले असून त्यामुळे हजारो शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. वीजपुरवठा बंद, रस्ते उखडले असून काही पूल वाहून गेले आहेत.
पोसरे, बौद्धवाडी गावाच्या जवळ असणारा डोंगर अर्धा किलो मीटर वाहून भोजन करत असलेल्या आठ कुटुंबियांना यमसदनी घेऊन गेला. असे अनेक कुटुंबीय बेघर आणि मनाने एकाकी पडले आहेत. इथे गरज आहे घर पुनर्वसनाची आणि एकाकी मनांना उभारी देण्याची. अशा परिस्थितीमध्ये पूरग्रस्त जनतेला मदतीची गरज आहे. याच अनुषंगाने श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाने जसे मागच्या २०१९ पुरामध्ये राजापूर भागात पुनर्वसन घरे बांधून दिली त्याप्रमाणे याही वेळेला एकूण १६ घरे पुनर्वसनासाठी तालुका चिपळूण आणि खेड येथे प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली बांधण्यात येत असून युद्धपातळीवर त्याची तयारी सुरू आहे.
तालुका चिपळूण मध्ये:
१. पेठमाप गणेश वाडी - २ घरे
२. मदरे दादर कळकवणे - २ घरे
३. गोवळकोट भोईवाडी - ३ घरे
४. मदरे काशी - १ घर
तालुका खेडमध्ये:
१. पोसरे, बौद्धवाडी - ८ घरे
बांधण्याचे नियोजित आहे. या बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक घरासाठी किमान रुपये अडीच लाख खर्च अपेक्षित आहे. या अनुषंगाने एकूण ४० लाखाचा घर पुनर्वसन निधी उभा करण्यासाठी समाजातल्या सर्व थरातील व्यक्ती, सामाजिक सेवा संस्थांनी, कंपन्यांनी, उद्योजक,नेते मंडळी, बांधवांनी आणि भगिनींनी एकत्र येऊन आपल्या या कोकणवासीयांना साथ देण्यासाठी सढळ हाताने मदत करावी, असे श्री सिद्धगिरी मठातर्फे, कोल्हापूर आवाहन करण्यात येत आहे.
घर बांधणीचा अंदाजे खर्च खालीलप्रमाणे
१. ६ फुटी सिमेंट पत्रे - २८ नग - रू ३०५००
२. २.५ इंच पाईप - २०० फूट - रू ७०००
३. २५ होलपास - ५० फूट - रू ३०००
४. दुक कोने ७ जोडे - रू १२५००
५. फॅब्रिकेशन मजुरी. - रू ११०००
६. जांभ्या दगड ६ गाडी. - रू ५६०००
७. सिमेंट ५० बॅग. - रू २२०००
८. बांबू ४ ब्रास. - रू ७०००
९. डबर. - रू २८०००
१०. बांधकाम मजुरी. - रू २३०००
११. दरवाजे फ्रेमसकट ५. - रू १८०००
१२. खिडक्या - रू ११०००
१३. प्लॅस्टर खर्च. - रू १९०००
१४. इतर खर्च - रू ३६००
एकूण खर्च. - रू २,५१,६००
आपली मदत खाली दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन आपण करू शकता.
Post a Comment