- महाड, पोलादपूर, चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीला श्रीसदस्यांचे हजारो हात सरसावले
- दोन दिवसात 9 जेसीबी, 28 डंम्पर, 11 ट्रॅक्टर व 3100 सदस्यांचा सहभाग
- डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
टीम म्हसळा लाईव्ह
जिल्ह्यातील महाड,पोलादपुरसह खेड, चिपळून येथील पुरग्रस्तांच्या मदतीला डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या हजारो श्रीसदस्यांचे हात सरसावले आहेत. सुमारे दिड हजार पेक्षा जास्त सदस्य शहरे स्वच्छ करण्याच्या कामात गुंतली आहेत.
महाड, पोलादपूर व रत्नागिरी जिल्हातील चिपळूण शहरामध्ये महापुराच्या पाण्याचा प्रवाह 20 फुटांपेक्षा जास्त आल्याने प्रवाहातील गाळ, चिखल, माती, दगड, झाडे झुडपे, प्राणी व अन्य कचरा, वाहने, घरातील वस्तु, किराणा दुकानातील नाशिवंत माल हा वस्तीत व रस्त्यावर पसरलेला आहे.
या सर्व वस्तु उचलण्यापासून ते रस्त्यावरती साचलेला गाळ यांची विल्हेवाट लावण्यासाठी पुरग्रस्थ भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री. डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच प्रतिष्ठानचे विश्वस्थ सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
हे स्वच्छता अभियानासाठी आज ( 27 जुलै) सकाळपासून प्रतिष्ठानचे सदस्य काम करत आहेत. तसेच शहरातील शासकीय कार्यालये देखील पुराग्रस्थ झाल्याने त्यांमधील गाळ व दस्तऐवज काढण्याकामी प्रतिष्ठानचे हजारो हात एकत्र आले आहेत. सदर स्वच्छता अभियानाच्यावेळी स्वत:चा जेवणाचा डबा, पाण्याची बॉटल तसेच सॅनिटायझर, माक्स याचा योग्य वापर करत स्वच्छतेचे काम सुरू आहे.
डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा मार्फत सातत्याने सामाजउपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जातात. महाड येथे दोन दिवसामध्येच प्रतिष्ठानच्या वतीने 9 जे.सी.बी. यंत्रे, 28 डंम्पर, 11 ट्रॅक्टर व 3100 पेक्षा जास्त सदस्यांच्या मदतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानासाठी महाड नगर परिषद, पोलादपूर व चिपळूण प्रशासनाने सहकार्य केले आहे. हे नियोजन स्वच्छता पूर्ण होई पर्यंत राहील.
Post a Comment